संतापजनक! फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोन मुलींना बेदम मारहाण, पाहा VIDEO - मुलींना मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
धार (मध्य प्रदेश) - तांडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळवा गावचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन युवतींसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मुलींना काठ्यांनी जबर मारहाण करीत आहेत. मारणारी मुलं ही मुलींच्या नात्यातील असल्याचं म्हटलं जातंय. कळस म्हणजे लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले मात्र कोणीच त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. फोनवर मुलांशी बोलल्यामुळे या मुलींना मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि मुलींचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.