Shiv Jayanti 2022 : पाथरीत 10 हजार 392 स्क्वेअर फुटांची रांगोळी प्रतिमा साकारुन शिवरायांना अभिवादन - छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022
🎬 Watch Now: Feature Video
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे. पाथरी शहरातील ज्ञानेश्वर नगरातील देवनांद्रा शाळेच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने तब्बल 10 हजार 392 स्क्वेअर फुट आकाराची ( artist created Shivaji Maharaj's 10,392 square foot's rangoli ) भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी प्रतिमा उभारुन त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. रांगोळी कलाकार ज्ञानेश्वर बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 17 क्विंटल रांगोळीपासून ही छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा तयार करण्यास ज्ञानेश्वर बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 17 तास लागले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST