Officer Drinking Alcohol In Balbharati Office : बालभारती कार्यालयातच अधिकारी आढळला दारु पिताना, पाहा Video - Maharashtra State Textbook Store Distribution Center Nashik
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14956626-thumbnail-3x2-officer-drinking-on-duty-in-balbharati-office-nashik.jpg)
नाशिक - मुंबई महामार्गावरील सिडको भागात बालभारतीचे कार्यालय ( Balbharati office Nashik ) आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र ( Maharashtra State Textbook Store Distribution Center Nashik ) असून या कार्यालयात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या लक्ष्मण डामसे हा अधिकारी दारू पिताना आढळून ( Officer Drinking Alcohol In Balbharati Office Nashik ) आला आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही धक्कादायक बाबसमोर आली आहे. स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही दिवसापासून हा अधिकारी कार्यालयात दारू पीत असल्याची माहिती संबंधित सेनेच्या पदाधिकाऱ्यांना येथील कर्मचाऱ्यांनी दिली होती. त्यानुसार आज त्या ठिकाणी पाहणी केली असता, अधिकारी डामसे हे कार्यालयातच मद्यपित बसले होते. त्यांनी यावेळी एवढे मद्यप्राशन केले होते. की त्यांना व्यवस्थित बोलता आणि चालता ही येत नव्हते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST