कराड तालुक्यात ८० एकरातील ऊस आगीत खाक, लाखो रुपयांचे नुकसान - sugarcane caught fire Rethare Budruk
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावातील ८० एकरातील ऊस सोमवारी (दि. 14) दुपारी आगीत खाक झाला. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. कृष्णा सहकारी साखर कारखाना असलेल्या रेठरे बुद्रुक गावातील पानमळा शिवारात भर दुपारी उसाला अचानक आग लागली. ही आग पवारमळी भागाकडे पसरत गेली. आग आटोक्यात आणण्यासाठी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. परंतु, घटनास्थळापर्यंत जाण्यास अडथळे आल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. या घटनेत ८० एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गाव कामगार, तलाठी विशाल पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST