अमरावतीच्या राजकमल चौकात उभारली 75 फुटांची गुढी; मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली पूजा - 75 फूट गुढी अमरावती
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - शहरातील राजकमल चौक येथे गुढीपाडव्यानिमित्त आज नवयुवक संघटना आणि शहर काँग्रेसच्या वतीने 75 फुटांची गुढी ( 75 feet Gudi Yashomati Thakur did puja ) उभारण्यात आली. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्त राजकमल चौक येथे ढोल ताशांच्या नादासह काँग्रेस कार्यकर्ते आणि नवयुवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झालेत. पालकमंत्री यशोमती ठाकूर या स्वतः या जल्लोषात सहभागी होऊन त्यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत फुगडी खेळली. ढोल ताशांच्या नादाने संपूर्ण राजकमल चौक परिसर दणाणून गेला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST