Kumar Sanu on Bappi Da : 'हे इंडस्ट्रीसाठी खूप मोठं नुकसान'; कुमार सानू यांची बप्पी लहरींच्या निधनावर प्रतिक्रिया - बप्पी लहरी मुंबईत निधन कुमार सानू प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14484725-thumbnail-3x2-k.jpg)
मुंबई - प्रसिद्ध संगीतकार व गायक बप्पी लहरी यांचे आज मुंबईत निधन झालं. ( Bappi Lahari Dies ) चाहत्यांसाठी 'बप्पी दा' असलेल्या कलाकाराने वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर संगीतकार कुमार सानू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Kumar Sanu on Bappi Lahari Death ) आपल्या शोकसंदेशात कुमार सानू यांनी म्हटले की, "बप्पीदा यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो. बाप्पा रेमा तुम्ही स्वतःला सांभाळा काळजी घ्या. बप्पीदा यांचे निधन हे संगीत क्षेत्रासाठी मोठी हानी आहे." दरम्यान, बप्पी लहरी यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्यांचा मुलगा बाप्पा हा कामानिमित्त अमेरिकेला असल्याने तो उद्या दुपारपर्यंत मुंबईत पोहोचेल. त्यानंतर बप्पीदा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST