Video : पोलिसांना चकमा देत न्यायालयातून आरोपी पळाला; शिताफीने पकडून केली अटक - चारकोप पोलीस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बोरिवली पोलिसांनी डझनभर गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका आरोपीला अटक केली होती. आज त्याला बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले. हजर झाल्यानंतर चारकोप पोलीस त्याला ताब्यात घेणार होते. मात्र आरोपीने पोलिसांना चकमा देऊन न्यायालयातून फरार झाला. आरोपी पळताना पाहून न्यायालयाबाहेर तैनात असलेले वाहतूक पोलीस आणि बोरिवली पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर धावत आरोपीला पकडले आणि चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध बोरीवली, चारकोप, कुरार, दहिसर आणि कांदिवली पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी, हिसकावणे, लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्याच्यावर बनावट पोलीस असल्याची नोंद आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST