Kanwariyas protest: यमुनानगरमध्ये कारने धडक दिल्याने कावड धारकांनी कारवर काढला राग, मोडतोड करुन दिली पेटवून - रादौर में कांवड़ियों ने कार में लगाई आग
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15916197-thumbnail-3x2-car.jpg)
यमुनानगर: सहारनपूर कुरुक्षेत्र रस्त्यावरील रादौरमध्ये एका बेदरकार कारने कावडी घेऊन जाणाऱ्यांना धडक दिली. यामध्ये कर्नालच्या पस्ताना येथील रहिवासी राकेश, चंदा आणि मुन्नी जखमी झाले. अपघातामुळे संतप्त झालेल्या कावडधारकांनी रास्तारोको करून घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी कारची तोडफोड करून ती पेटवून दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी चालकाला येथून पळवून लावल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पोलिसांशी गैरवर्तन कावडधारकांनी रस्त्यावर बसून घोषणाबाजी करण्यास सुरू केली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून इतर पोलिस ठाण्यांमधून पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. तगडा पोलिस बंदोबस्त पाहून कावडधारक पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी होंडा सिटी कारची आग विझवली आणि रस्त्याच्या मधोमध असलेली कार बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. (kanwariyas protest in yamunanagar)
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST