Yeola Political News : येवल्यात युवासेनेला धक्का; पदाधिकारी शिंदे गटात दाखल - Senas Official Left For Mumbai To Join The Shinde Group
🎬 Watch Now: Feature Video

नाशिक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना समर्थन देण्यासाठी आता ग्रामीण भागातून देखील युवा सेनेचे काही पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे. येवला तालुक्यातील युवा सेनेचे 50 पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले (Office bearers and workers of Yuva Sena left for Mumbai ) आहेत. दुपारी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणारा असून त्यानंतर येवल्यात आल्यावर मोठा जल्लोष साजरा करणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST