अजित पवारांची कोणालाच गॅरेंटी राहिलेली नाही -डॉ. नीलम गोऱ्हे - Neelam Gorhe
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी येथे सुरू असलेल्या चिंतन शिबिर समारंभात काल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाला आले असताना राष्ट्रवादीचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनुपुस्थिती लावली. यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांना जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विरोधी पक्षातील अनेक आमदारांच्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे. यावर विचारले असता ते म्हणाले की, पूर्वी गिरीश बापट जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा मी डोळ्याने बघितले आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बोलावून प्रेमाने निधी देत होते. आता तसे राहीले नाही. पुण्यात माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यावतीने आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे आल्या होत्या त्यावेळी त्या माध्यामांशी बोलत होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST