Peacock in Raj Bhavan: नाच रे मोरा राजभवनात; पाहा थुई थुई नाचतानाचा व्हिडिओ - A peacock dances in the Rajbhavan
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राजभवन हे विविध राजकीय हालचालींचे केंद्रबिंदू बनले आहे. आपल्याला राजभावनाकडून बोलावणे येईल आणि मंत्री पदाची माळ गळ्यात पडेल या अशाने अनेकांच्या मनातला मोर नाचतो मात्र सध्या राजभवनाच्या हिरवळीवर नाचणारा खरा मोर लक्ष वेधून घेतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी सातत्याने चर्चेत आहेत. राजभवनावर होणारे कार्यक्रम आणि राजकीय घडामोडी याबाबत सातत्याने उलट सुलट चर्चा होत असते. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारच्या बारा सदस्यांना अखेरपर्यंत नियुक्त केले नाही. त्यामुळे टीकेचे धनी झालेले राज्यपाल कोशारी विविध वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय पटलावर चर्चेत राहिले आहेत. त्यातच आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याने राजभवनाकडून आपल्याला बोलावणे येईल आणि मंत्री पदाची माळ गळ्यात पडेल या आशेने अनेक आमदार राजभनाकडे पाहत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST