Mumbai Police Band Plays Srivalli Song : मुंबई पोलिसांच्या बँन्ड पथकाला Pushpa चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची भुरळ - मुंबई पोलीस दलातील बँन्ड पथकाने श्रीवल्ली गाण्याची धुण वाजवली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 18, 2022, 3:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

मुंबई - अल्लू अर्जूनच्या सर्वत्र पुष्पा द राईज चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची हवा सुरुच ( Srivalli song ) आहे. अल्लू अर्जूनने साकारलेल्या पुष्पाचे अवघ्या देशालाच येड लागले. पुष्पा पुष्पराज या चित्रपटाने लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना भुरळ पाडली आहे. पुष्पा चित्रपटावर ज्याप्रमाणे लोकांच्या मनावर राज्य केले आहे. त्या चित्रपटामधील श्रीवल्ली या गाण्याने सर्वांच्याच मनात घर केले आहे. मुंबई पोलिसांना या गाण्याची भुरळ पडली आहे. मुंबई पोलीस दलातील बँन्ड पथकाने हे गाणे आपल्या अंदाजात म्युझिकच्या तालात ( Mumbai Police Band Plays Srivalli Song ) म्हटले आहे. त्याची सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबई पोलीस बँन्डने चित्रपटातील लोकप्रिय श्रीवल्ली गाण्याचे सादरीकरण केले आणि व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ सोमवारी शूट करण्यात आला ज्यामध्ये पथकातील सदस्य सनई, सॅक्सोफोन, ट्रम्पेट आणि बासरीसारखे वाद्य वाजवताना दिसत आहेत. मुंबई पोलिस बॅन्ड पथकाने श्रीवल्ली हे गाणं बॅन्डवर वाजवले. मुंबई पोलिसांची सुरेल सफर कभी रुकेगा नहीं असे कॅप्शन दिले. ड्रम, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी अशा अनेक वाद्यांच्या समावेश श्रीवल्ली गाण्याचं बॅन्ड व्हर्जन तयार करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.