MP Navneet Rana On Sanjay Raut : महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राऊत एजंट होते; नवनीत राणा यांचा घणाघात - ईडी
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - एका सामान्य पत्रकाराकडे एवढी मोठी संपत्ती असेल तर, ती संपत्ती कुठून व कशी आली. खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी दिली आहे. राऊत यांच्यावर ईडी कारवाई बाबत ( ED action against MP Sanjay Raut ) त्यांनी माध्यमांशी संवाद शाधला. एखादी व्यक्ती कोणत्याही गैर मार्गाने पैसा जमा करत असेल तर त्याचा हिशोब त्याने सरकारला देणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राऊत हे एजंट ( Agent in Raut Mahavikas Aghadi Govt ) म्हणून काम करत होते. तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर, तुम्हाला भीती कशाची आहे असा प्रतिप्रश्न राणा यांनी उपस्थित केला. कर नाही तर मग डर कशाला? आग लागली आहे म्हणूनच धुवा उठला आहे. केंद्र सरकार यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. संजय राऊत यांना ईडी च्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावे लागेल असे त्या म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST