Uddhav Thackeray : आम्ही आरएसएसला मुस्लिम संघ म्हणायचं का? भाजपला सोडलंय, हिंदुत्वाला नाही.. पहा उद्धव ठाकरेंचे संपूर्ण भाषण.. - उद्धव ठाकरे हिंदुत्व
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : आम्ही भाजपला सोडलं आहे. हिंदुत्वाला नाही. एमआयएम सोबत युती कदापिही शक्य नाही. मध्येच एमआयएमने आमच्याशी युती करण्याचा विषय कसा काढला? हे सगळं भाजपचं षडयंत्र आहे. काही दिवसांपूर्वी आरएसएसने मुस्लिमबहुल भागात संघाच्या शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मग आम्ही आरएसएसला मुस्लिम संघ म्हणायचं का? मोहन भागवत यांना खान म्हणायचं का? अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. भाजपचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल करत, सरकारचा संबंध दाऊदशी जोडणे चुकीचे असून विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजपचे हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपले हिंदुत्व हे देशाच्या हिताचे आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका. विरोधकांचा डाव हाणून पाडा. राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST