Nagpur Viral Video : वार्डात भूमीपूजनासाठी गेलेल्या नगरसेवकावर नागरिकांनी केला प्रश्नांचा भडिमार - विक्की कुकरेजा व्हिडिओ व्हायरल

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 10, 2022, 12:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

नागपूर - विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा (BJP corporator Vicky Kukreja ) यांनी नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने नागरिकांनी त्यांना घेराव (Citizens surround Vicky Kukreja) घातला. यावेळी नागरिकांनी घेराव घातल्याने कुकरेजा याना नागरिकांच्या संतापला समोर जावे लागले. रविवार विक्की कुकरेजा हे नारा, समतानगर, श्रमिकनगर, देवनगर रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी गेल्यावर हा प्रसंग घडला. पण व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही बाब आज समोर आली आहे. यामध्ये नागरिकांना 2017 मध्ये दिलेले आश्वासन अजून पूर्ण न केल्याने आणि पाच वर्ष न दिसणारे नगरसेवक आता निवडणुका पाहता दिसले, असा ही आरोप त्यांच्यावर केला. पण भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी हे सर्व आरोप फेटाळत (Vicky Kukreja denied all the allegations) विकास कामे केल्याचे माध्यमांना सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.