VIDEO : पुण्यातील शाळेत पुन्हा बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की - युरो शाळा पालक धक्काबुक्की
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेतही पुन्हा बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे टीसी पाठवली असून, त्या मुलांना शाळेत पुन्हा बसवले जात नाही आहे. मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालक शाळेत गेले होते. बिबवेवाडी येथील शाळेतील बाउन्सरकडून पालकांना झालेल्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधानसभेतही चर्चिला गेला होता. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाउन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे असताना देखील शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराच्या टोपल्या दिल्या जात असून, विद्यार्थ्यांनी फी भरावी म्हणून शाळा प्रशासन कोणत्याही स्तराला जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST