Bengal monitor in bungalow : जेलरच्या बंगल्यात घोरपड घुसल्याने कर्मचांऱ्यासह कैद्यांची धावपळ; 'अशी' केली सुटका - घोरपड जेलर बंगला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 22, 2022, 8:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ठाणे - आधरावाडी जेलरच्या बंगल्यात ( Adharawadi jailer bungalow ) घोरपड घुसल्याने ( Bengal monitor in Bungalow ) जेल कर्मचाऱ्यासह कैद्यांची त्या घोरपडीला पकडण्यासाठी एकच धावपळ उडाली होती. मात्र, घोरपड चपळ असल्याने त्यांच्या हाती लागली नाही. अखेर प्राणी मित्राच्या मदतीने या घोरपडीला बंगल्यातून पकडून तिची सुटका केली आहे. कल्याण पश्चिम भागात आधरावाडी जेल बाजूला डी. बी. चौकात जेलरचा बंगला आहे. सर्प-प्राणी मित्र दत्ता बोबे ( Animal lover Datta bobe ) यांनी काही वेळातच घटनास्थळी कपाटात लपून बसलेली घोरपड पकडली. त्यानंतर घोरपडची माहिती कल्याण वन अधिकाऱ्यांना देऊन या घोरपडीला बंगल्याच्या मागे असलेल्या जंगल भागात सोडून तिला जीवदान दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.