हैदराबाद : जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय, आरोग्याला अपायकारक अन्न खाणं, जेवल्यानंतर कोणत्याही प्रकारची हालचाल न करणं… या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसला तरी पुढे अनेक समस्या उद्भवू शकतात. पचनाशी संबंधित समस्यांपैकी एक म्हणजे सूज येणं, ज्यामध्ये खाल्ल्यानंतर तुम्हाला फुगल्यासारखे वाटतं. पोट फुगल्यामुळे एखाद्याला अस्वस्थ वाटतं. काही खाण्याची इच्छा होत नाही. कधी कधी वेदना जाणवतात. जर तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल आणि लवकरात लवकर यापासून मुक्ती मिळवू इच्छित असाल तर योग तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. या समस्येवर कोणती योगासने प्रभावी आहेत, इथे जाणून घ्या.
1.धनुरासन :
- हे आसन करण्यासाठी पोटावर जमिनीवर झोपावं.
- आपले गुडघे वाकवा आणि आपल्या हातांनी गुडघे धरा.
- दीर्घ श्वास घेत हातानं पाय वरच्या बाजूला खेचा.
- हे आसन करताना शरीराचा आकार धनुष्यासारखा दिसेल.
- शक्य तितक्या वेळ या स्थितीत रहा. त्यानंतर श्वास सोडताना खाली या.
- काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर नॉर्मल स्थितीत या.
- हे 3 ते 5 वेळा पुन्हा करा.
2. भुजंगासन :
- हे आसन करण्यासाठी पोटावर जमिनीवर झोपा.
- कोपर वाकवताना तळवे छातीजवळ ठेवा.
- आता हळूहळू श्वास घेताना तळहातांवर दाब देत छाती वरच्या बाजूला करा.
- पोटही थोडे वर येईल, पण नाभीच्या खालचा भाग चटईला स्पर्श करून ठेवावा लागतो. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत रहा.
- श्वास सोडताना, हळूहळू आपले पोट, छाती आणि डोके खाली करा.
- हे आसन तुम्ही 3-5 वेळा करू शकता.
3. पवनमुक्तासन :
- हे आसन करण्यासाठी आधी पाठीवर झोपा.
- आता तुमचे दोन्ही पाय एकत्र उचला आणि गुडघे वाकवा.
- आता श्वास घेताना दोन्ही हातांनी गुडघे झाकून हलके दाबावे. त्यामुळे पोटावर दाब पडतो. ते गॅस सोडू शकते.
- आपल्या नाकाला गुडघ्यापर्यंत स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
- सुमारे 30-60 सेकंद या स्थितीत रहा.
- मग हळूहळू सुरुवातीच्या स्थितीकडे परत या.
हेही वाचा :