ETV Bharat / sukhibhava

World Obesity Day 2023 : जगासमोरचे सगळ्यात मोठे आरोग्य संकट बनले लठ्ठपणा; कशी घ्यावी काळजी - डोकेदुखीचा आजार म्हणून लठ्ठपणा

लठ्ठपणा हे जगासमोरील सर्वात मोठे आरोग्य संकट असल्याचे बोलले जाते. मात्र लठ्ठपणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ४ मार्च हा दिवस जागतिक लठ्ठपणा दिन म्हणू साजरा करण्यात येतो.

World Obesity Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 3, 2023, 4:39 PM IST

हैदराबाद : सध्या जगासमोरील सगळ्यात मोठा डोकेदुखीचा आजार म्हणून लठ्ठपणा या आजाराकडे पाहिले जाते. लठ्ठपणाची दररोज वाढत जाणारी प्रकरणे आणि त्यांना रोखण्यासाठी अपुरी असलेली आरोग्य व्यवस्था या मुळे लठ्ठपणा आलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन साजरा करण्यात येतो. अगोदर हा दिवस ११ ऑक्टोबरला साजरा करण्यात येत होता. मात्र २०२० नंतर तो ४ मार्चला साजरा करण्यात येत आहे.

लठ्ठपणा ठरले जागतिक आरोग्य संकट : लठ्ठपणा या समस्येने अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे लठ्ठपणा हे जगासमोरील सर्वात मोठे आरोग्य संकट मानले जात आहे. लठ्ठपणाच्या होण्याच्या कारणांबद्दल जागरूकता पसरवून त्याचे निदान आणि प्रतिबंध करण्यासाठी 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन साजरा करण्यात येतो. यातून लठ्ठपणा असलेल्या नागरिकांच्या समस्यांवर उपाय सूचवण्यात येतात. लठ्ठपणा हे जगभरातील सगळ्याच देशातील मोठी समस्या बनल्याने जागतिक पातळीवर नवे आरोग्य संकट उभे ठाकले आहे.

काय आहे जागतिक लठ्ठपणा दिनाची थीम : लठ्ठपणा आजाराविषयी जागरूकता करणे गरजेचे आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर आरोग्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी दरवर्षी जागतिक लठ्ठपणा दिनाची सुरुवात करण्यात आली आहे. जागतिक लठ्ठपणा दिन साजरा करताना दरवर्षी एक थीम घेऊन त्याबाबातची जनजागृती करण्यात येते. यावर्षी 'चेंजिंग पर्स्पेक्टिव्स : लेट्स टॉक अबाउट ओबेसिटी' ही थीम गेऊन जागतिक लठ्ठपणा दिन साजरा करण्यात येत आहे. अधिकाधिक लोक लठ्ठपणाबद्दल उघडपणे बोलू शकतील हा या थीमचा उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

लठ्ठपणा असलेल्या नागरिकांची उडवतात मजाक : लठ्ठपणा असलेल्या नागरिकांची सहसा कोणीही मजाक उडवताना दिसून येते. लठ्ठ नागरिक सहसा कौटुंबिक, कार्यालय, शाळा किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये इतर लोकांचे लक्ष किंवा उपहासाचा विषय बनतात. मात्र अनेक वेळा लठ्ठ असलेले व्यक्ती आपली चेष्टा करतील या भीतीपोटी आपल्या समस्या कुटूंबियांना सांगत नाहीत. अशा परिस्थितीत बरेच जण नैराश्याचे बळी देखील होतात. त्यामुळे त्यांना लठ्ठपणाबद्दल खुलेपणाने बोलण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी ही थीम निवडण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

काय आहे जागतिक लठ्ठपणा दिन साजरा करण्याचा उद्देश : सद्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग आणि पक्षाघात यासह अनेक गंभीर आजारांच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. या सगळ्या आजारांचे मूळ लठ्ठपणा असल्याचे मुख्य कारण मानले जाते. सध्या जगभरात सुमारे 1 अब्ज लोकांना लठ्ठपणाच्या आजाराचा सामना करावा लागत असल्याचे वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार दिसून येते. त्याचवेळी 2035 पर्यंत ही संख्या 1.9 अब्ज वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजेच 2035 पर्यंत दर चारपैकी एक जण लठ्ठपणाचा बळी ठरू शकणार असल्याची माहिती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

तीन पटीने वाढला लठ्ठपणा : लठ्ठपणा वाढल्याने अनेक आजारांचा नागरिकांना सामना करावा लागतो. 1975 पासून लठ्ठपणाचे प्रमाण जवळपास तीन पटीने वाढले आहे. सध्या सर्व विकसित आणि विकसनशील देशांमध्ये सर्व वयोगटातील लोकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण सतत वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 2020 मध्ये 5 वर्षाखालील 39 दशलक्ष मुले लठ्ठ असल्याचे आढळून आल्याची माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिली आहे. पुढील सात वर्षांत भारतातील 27 दशलक्षाहून अधिक मुले लठ्ठ होतील असे युनिसेफच्या जागतिक लठ्ठपणा आकडेवारीनुसार स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर 10 मुलांपैकी एक जण लठ्ठपणाने ग्रासल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - World Kidney Day 2023 : किडनी आजाराने एका वर्षात होतो दोन लाख नागरिकांचा मृत्यू, किडनीचा आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.