ETV Bharat / sukhibhava

World Malaria Day 2023 : दर दोन मिनिटाला मलेरियाने होतो एक मृत्यू, जाणून घ्या जागतिक मलेरिया दिनाचा इतिहास - विषाणू

मलेरियाने जगभरात धुमाकूळ घातला असून मलेरियाचा सगळ्यात जास्त प्रसार आफ्रिकेत होत आहे. जगभरात दर दोन मिनिटाला एका बालकाचा मलेरियाने मृत्यू होतो.

World Malaria Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 21, 2023, 10:35 AM IST

Updated : Apr 25, 2023, 7:40 AM IST

हैदराबाद : जगभरात सध्या कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे. मात्र दुसरीकडे मलेरियानेही आपले डोके वर काढले आहे. मलेरियामुळे आतापर्यंत जगभरातील 6 लाख 27 नागरिकांचा बळी घेतला आहे. मलेरियाकडे दुर्लक्ष करणे नागरिकांना मोठे महागात पडू शकते. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन साजरा करण्यात येते.

काय आहे मलेरिया दिनाचा इतिहास : मलेरियाच्या विषाणूंनी जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील नागरिकांना विशेषता मुलांना मलेरियाने ग्रासल्याचे दिसून आले. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जागतिक आरोग्य संघटनेकडून 2007 मध्ये भरलेल्या जागतिक आरोग्य परिषदेत याबातचा ठराव मांडण्यात आला होता. त्यानुसार 25 एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने मलेरिया दिन घोषित करण्यात आला. त्यानंतर मलेरियाने बाधित असलेल्या 44 देशांनी आफ्रिकेत आयोजित परिषदेत सहभाग घेतला होता. या जागतिक आरोग्य परिषदेत 2001 ला पहिल्यांदा जागतिक मलेरिया दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून जागतिक मलेरिया दिन साजरा करण्यात येतो.

कशामुळे होतो मलेरिया : मलेरिया या आजाराने जगभरात दर दोन मिनिटाला एका बालकाचा मृत्यू होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मलेरिया हा आजार किती घातक आहे, याची प्रचिती येते. मलेरिया हा आजार प्लॅसमोडियम प्रजातीच्या विषाणूंमुळे होतो. मलेरियाला कारणीभूत असलेल्या अनिफिलास डासांच्या माद्यांना मलेरिया व्हेक्टर असे संबोधित करतात. डासांच्या या माद्या मलेरियाचे पॅरासाईटस अर्थात परजीवी विषाणू व्यक्तीच्या शरीरात सोडत असल्याने मलेरियाची लागण होते. मलेरियाची लागण झाल्यास त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो. मलेरियाचा सर्वाधिक प्रसार हा आफ्रिकेत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

काय आहेत मलेरियाचे लक्षणे : मलेरियामुळे 2017 मध्ये तब्बल 92 टक्के रुग्ण एकट्या आफ्रिकेत आढळून आले होते. इतकेच नव्हे तर तब्बल 93 टक्के मलेरिया रुग्णांचे मृत्यू हे ऑफ्रिकेतच घडून आले होते. त्यामुळे आफ्रिकेला मलेरियाने किती मोठा विळखा घातला, हे स्पष्ट होते. मलेरिया झाल्याचे निदान वेळीच झाल्यास त्यावर उपचार करता येतात. त्यामुळे मलेरियाची लक्षणे नेमकी कोणती आहेत, त्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. मलेरियाच्या डासाने चावल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी ताप येणे, डोके दुखणे, थंडी वाजणे ही प्राथमिक लक्षणे दिसून येतात. अशा प्रकारची मलेरियाची लक्षणे दिसून आल्यास 24 तासाच्या आत उपचार करणे गरजेचे आहे. नाहीतर जीवाला धोका होण्याची शक्यता असते.

हेही वाचा - World Liver Day 2023: आज जागतिक यकृत दिन; निरोगी जीवनासाठी यकृताची 'अशी' घ्या काळजी

Last Updated : Apr 25, 2023, 7:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.