ETV Bharat / sukhibhava

World Kidney Day 2023 : किडनी आजाराने एका वर्षात होतो दोन लाख नागरिकांचा मृत्यू, किडनीचा आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी - जागतिक किडनी दिन

किडनी आजारामुळे अनेकांच्या मागे नियमित डायलिसीस करण्याचा ससेमिरा लागतो. त्यामुळे किडनी आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे गुरुवारी ९ मार्चला जागतिक किडनी दिन साजरा करण्यात येत आहे.

World Kidney Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 3, 2023, 3:37 PM IST

हैदराबाद : जगभारातील अनेक नागरिकांना किडनीच्या आजाराने ग्रासल्याने मृत्यूचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन जागृती करण्यासाठी जागतिक किडनी दिन साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून २०२६ पासून जागतिक किडनी दिन साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. यावर्षी ९ मार्चला किडनी दिन साजरा करण्यात येणार आहे.

का करण्यात येतो किडनी दिन साजरा : जागतिक स्तरावर किडनी रोगाने ग्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या किडनी रोगाला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन यांनी ६६ देशात किडनी दिनाच्या आयोजनाला २०२६ मध्ये सुरुवात केली आहे. तेव्हापासून जगभरात जागतिक किडनी दिन साजरा करण्यात येतो.

कशामुळे होऊ शकते किडनी खराब : किडनी आजारामुळे देशभरातील अनेक नागरिकांवर नियमित डायलिसीसचा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे किडनीग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य आहार घेणे गरजेचे आहे. मात्र असंतुलित आहारामुळे नागरिकांना किडनी आजाराचा सामना करावा लागत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. अस्वास्थ्य जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळे नागरिकांमध्ये किडनीबाबत समस्या निर्माण होतात. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, वेदनाशामक औषधांचे अतिसेवन आणि आनुवंशिकता यामुळेही किडनीला धोका होऊ शकतो, असेही तज्ज्ञ स्पष्ट करतात. नागरिकांना मूत्रपिंड निकामी होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. कधी अज्ञानामुळे तर कधी निष्काळजीपणामुळे किडनीचा आजार बळावतो. त्यामुळे किडनीचा आजार असल्याचे निदान होईपर्यंत 65 ते 70 टक्के मूत्रपिंड खराब झालेले असते.

एका वर्षात २ लाख नागरिकांचा मृत्यू : किडनीच्या आजाराने नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. भारतात एका वर्षात २ लाख नागरिकांचा मृत्यू किडनीच्या आजाराने होत असल्याचे विविध अहवालावरुन दिसून येते. तर भारतात दर पाच मिनीटात दोन नागरिक किडनीमुळे आपला जीव गमावत आहेत. दरदिवशी किडनीच्या आजाराने मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या तर ५४७ इतकी असल्याचेही किडनी तज्ज्ञांच्या विविध अहवालावरुन स्पष्ट होते.

किडनी रोगाचे आहेत दोन प्रकार : किडनी निकामी होण्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत. यात पॉलिसिस्टिक किडनी रोग आणि युरीनरी टेक्ट किडनी रोग यांचा समावेश आहे. यातील पॉलिसिस्टिक किडनी रोग हा किडनी निकामी झाल्यामुळे होते. अर्थात किडनी फेल्युअर झाल्याने नागरिकांचा मृत्यू होतो. याचे प्रमाण आपल्या देशात अधिक असल्याचेही दिसून येते. किडनीत गाठी निर्माण होऊन हळूहळू किडनी निकामी होते. त्यानंतर नागरिकाचा मृत्यू होत असल्याचे किडनी तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ट केले. तर दुसऱ्या प्रकारात मूत्रपिंड, मृत्राशय मूत्रमार्ग यांना संसर्ग झाल्यास नागरिकाचा मृत्यू होतो.

दारू सिगारेटच्या अतिसेवनाने होते किडनी फेल : काही तरुणांना खूप दारू पिण्याचे व्यसन असते. तर काहीजण खूप मोठ्या प्रमाणात धूम्रपान करतात. असा नागरिकांची किडनी फेल होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या व्यसनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला किडनीतज्ज्ञ देतात. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनाही किडनी निकामी होण्याचा धोका जास्त असतो.

अशी घ्या काळजी :

  • किडनीचा आजार असलेल्या नागरिकांनी रोज जेवणात किमान
  • 8 - 10 ग्लास पाणी प्यावे. जेवणात मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.
  • प्रक्रिया केलेले पदार्थ आणि बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण ठेवावे
  • सकस आहार घेऊन वजन नियंत्रणात ठेवावे.
  • खाण्यात फलाहार घ्यावा
  • दररोज हिरव्या पालेभाज्या जेवणात खाव्या
  • रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत रहावे
  • मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणा असेल तर मूत्रपिंडाची तपासणी नियमित करावी

हेही वाचा - World Hearing Day 2023 : जगभरातील दीड अब्ज लोकांना ऐकू न येण्याची समस्या, तर भारतात २७ हजार नागरिकांना दरवर्षी होतो बहिरेपणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.