हैदराबाद : प्रत्येक वर्षी मे महिन्यातील 5 तारखेला जागतिक हात स्वच्छता दिवस साजरा केला जातो. आता आपण सर्वजण म्हणाल की, हात स्वच्छ करण्याचा दिवस देखील असतो का पण वाचक मित्रांनो हे खरे आहे, हा दिवस असतो. हात स्वच्छ नसले तर आपल्याला अनेक आजार लागण्याची शक्यता असते. कोरोना या महामारीच्या काळात हाताची स्वच्छता करणे किती आवश्यक आहे याची जाणीव अनेकांना झाली. हाताची स्वच्छता करणे आवश्यक असल्याची जाणीव नागरिाकांना व्हावी यासाठी जागितक आरोग्य संघटना हा दिवस 5 मे रोजी जागतिक हात स्वच्छता दिवस म्हणून साजरा करत असते.
हात स्वच्छ करण्याची सवय असावी : चेहऱ्याला वारंवार स्पर्श न करणे, जेवल्यानंतर हात धुणे आणि आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे. हे कोविडच्या काळात आपण सर्वजण समजलो आहोत. प्रत्येकाने हात स्वच्छ करण्याची सवय ठेवली पाहिजे. कारण हात स्वच्छ केल्याने विषाणूंपासून आपले संरक्षण होईल, आजार देखिल होणार नाहीत. संसर्गजन्य आजार असतात ते हाताद्वारे पसरत असतात. त्या आजारांपासून बचाव व्हावा यासाठी हातांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. जर आपले हात अस्वच्छ असले तर संसर्ग वेगात पसरत असतो. त्यामुळे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण हात नेहमी स्वच्छ केले पाहिजेत.
जागतिक हात स्वच्छ दिवस : रुग्णालयात हातांमुळे पसरणारे संसर्ग आजार आणि हातांची स्वच्छता राखण्याचे महत्त्व याविषयी सर्वच रुग्णालयामध्ये सांगितली जात नाही. आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांनी आपले हात योग्यप्रकारे स्वच्छ केले पाहिजे. तर प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देत प्रत्येक नागरिकाला हात स्वच्छ करण्यासाठी पुरेशी सुविधा पुरविली पाहिजे. जागतिक हात स्वच्छ दिवस या मोहिमेचे खास उद्दिष्ट हे क्लीन युवर हॅड्स आहे. याची जाणीव सर्व नागरिकांना व्हावी यासाठी आरोग्य सेवेतील लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. तसेच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपले हात काळजीपूर्वक स्वच्छ केले पाहिजेत.
या मोहिमेला प्रतिसाद मिळावा म्हणून पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनने अमेरिकेतील नागरिकांना हात स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. यावर्षी जागतिक हात स्वच्छ दिवसाची थीम ही आरोग्य सेवेमध्ये एकत्रितपणे संसर्ग आणि प्रतिजैविक लढा वाढवावा तसेच हात स्वच्छ करण्यास प्राधान्य द्यावे. दरम्यान 2009 मध्ये ही जागतिक मोहीम सुरू करण्यात आली असून याचे उद्दिष्ट क्लीन युवर हॅण्डस हे आहे. नागरिकांना हाताच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर प्रत्येक वर्षी 5 मे रोजी हात स्वच्छता दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कधी - कधी धुवावे आपले हात :
- तुम्ही आरोग्य सेवेत असाल तर रुग्णाला स्पर्श करण्यापूर्वी
- रुग्ण जेथे आहेत तेथील वस्तूंना हात लावण्यापूर्वी
- हातमोजे घालण्यापूर्वी हात धुतले पाहिजेत. कारण रुग्णाच्या वातावरणात असलेले विषाणूंमुळे आरोग्यावर परिणाम होत असतो.
हात कसे धुवावे : हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्यांनी साधारण एक मिनिटभर हात धुवावेत. अल्कोहोल अधारित द्रव वापरून आपले हात स्वच्छ केले पाहिजेत. जर जे लोक शस्त्रक्रिया विभागात काम करतात त्यांनी किमान तीन ते पाच मिनिटे हात धुवावेत.
हात धुण्याची योग्य प्रक्रिया : सर्वात आधी स्वच्छ पाण्याने हात धुवून घ्या. यामुळे हातांवरील धूळ, स्वच्छ धुतली जाते. यानंतर साबण किंवा हँण्डवॉशने हात स्वच्छ करा.
हेही वाचा : Climate Change : तीव्र उष्णतेच्या लाटा का निर्माण होत आहेत? जाणून घ्या कारण