ETV Bharat / sukhibhava

जागतिक कर्करोग दिन : कर्करोगाबद्दलचे सर्वसाधारण गैरसमज काढून टाका - कर्करोगाबद्दल गैरसमज माहिती

कर्करोग म्हणजे काय, हे जवळ जवळ सगळ्यांनाच माहीत आहे. पण कर्करोगाबद्दल काही तथ्य अनेकांना ठाऊक नसते. म्हणूनच जागतिक कर्करोग दिनानिमित्त आम्ही कर्करोगाबद्दलचे सर्वसाधारण गैरसमज दूर करत आहोत आणि त्याच वेळी काही वास्तविक तथ्येही सांगत आहोत.

World Cancer Day
जागतिक कर्करोग दिन
author img

By

Published : Feb 5, 2021, 6:37 AM IST

हैदराबाद - कर्करोगाच्या रुग्णांमध्ये येत्या काही वर्षात खूप नाट्यमयरीत्या वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक मृत्यूंमध्ये कर्करोगाने होणारे मृत्यू दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे २०१८ मध्ये ९.६ दशलक्ष मृत्यू कर्करोगामुळे झाले आहेत. जगभरात ६ मृत्यूंमध्ये १ मृत्यू हा कर्करोगाने होतोय. कर्करोग मुख्यत: पुढील प्रकारात होतात.

  • फुफ्फुसे ( २.०९ दशलक्ष रुग्ण )
  • स्तन ( २.०९ दशलक्ष रुग्ण )
  • कोलोरेक्टल ( १.८० दशलक्ष रुग्ण )
  • प्रोस्टेट ( १.२८ दशलक्ष रुग्ण )
  • त्वचेचा कर्करोग ( १.०४ दशलक्ष रुग्ण )
  • पोट ( १.०३ दशलक्ष रुग्ण )

दर वर्षी ४ फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि लोकांना याबद्दल शिक्षण देण्यासाठी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. या जीवघेण्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी जगभरातील प्रत्येकाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. कर्करोग, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) द्वारे परिभाषित केल्याप्रमाणे, या रोगामध्ये असामान्य पेशी नियंत्रणाबाहेर विभाजित होतात आणि त्या इतर टिश्यूंवर आक्रमण करण्यास सक्षम असतात. कर्करोग रक्त आणि लसिकांमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. त्यांच्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडायला लागतात.

कर्करोगाबद्दल असलेले काही गैरसमज -

कर्करोग संसर्गजन्य आहे

बहुतेक कर्करोग हे संसर्गजन्य नसतात. पण व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे उद्भवणारे काही कर्करोग एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरतात. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयजेएमआर) च्या मते, “ गर्भाशयाच्या खालच्या भागाचा कर्करोग (मानवी पॅपिलोमा विषाणूमुळे होतो) आणि यकृत कर्करोग (हेपेटायटीस बी आणि सी विषाणूमुळे होतो) या व्यतिरिक्त, कर्करोगाचे इतर कोणतेही रूप संक्रमक नाही. रक्ताचे संक्रमण, एकच सुया अनेकांना टोचल्या आणि असुरक्षित लैंगिक संबंध यामुळेच या संसर्गजन्य असलेल्या कर्करोगाचे संक्रमण होते.

कर्करोग हा नेहमीच जीवघेणा असतो

नाही. कर्करोग हा नेहमीच जीवघेणा नसतो. औषध आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती झाल्यावर अनेक उपचार आता उपलब्ध आहेत. म्हणूनच, कर्करोगाच्या उपचारानंतरचे रुग्ण जिवंत राहण्याचे प्रमाण आता जास्त आहे. पण रुग्ण जगेल की नाही किंवा किती वर्ष जगेल हे कर्करोग शरीरतल्या कुठल्या भागात आणि किती पसरला आहे, यावर अवलंबून असते. याशिवाय परिणामकारक उपचार उपलब्ध आहे की नाही, व्यक्तीचे एकूण आरोग्य यावरही हे अवलंबून आहे.

डिओडरंटमुळे स्तनाचा कर्करोग होतो

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या मते अनेक अभ्यासावरून असे आढळून आले आहे की, डिओटरंटमधल्या रसायनांमुळे स्तनातल्या टिश्यूंमध्ये काहीही बदल होत नाही.

फक्त धूम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो

धूम्रपान केल्याने लोकांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका निश्चितच वाढतो, परंतु धूम्रपान न करणार्‍यांनाही हा धोका असू शकतो. आयजेएमआरने म्हटले आहे की एस्बेस्टोस, रेडॉन, युरेनियम, आर्सेनिक, अनुवांशिक स्थिती, पॅसिव्ह धूम्रपान आणि फुफ्फुसामध्ये दुसरा कुठला महत्त्वाचा आजार असेल तर फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.

साखरेमुळे कर्करोगाची स्थिती आणखी वाईट होते ?

नाही. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या म्हणण्याप्रमाणे, जरी संशोधनात असे दिसून आले आहे की कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींपेक्षा जास्त साखर (ग्लुकोज) वापरतात, तरी अभ्यास केल्याने असे सिद्ध झाले नाही की साखर खाण्याने कर्करोग जास्त वाढू शकतो किंवा साखर खाणे बंद केले तर कर्करोग बरा होतो. असे काही होत नाही. पण साखर जास्त खाल्ल्याने तुमचे वजन वाढते आणि लठ्ठपणामुळे वेगवेगळे कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकत नाही

खोटे आहे. पुरुषांनाही स्तनांचे टिश्यूज असल्यानेच त्यांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. जरी पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण फारच कमी असले तरीही त्यांना त्याचा धोका आहे.

सकारात्मकतेमुळे कर्करोग बरा होतो

कोणत्याही उपचारादरम्यान सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे खूप आवश्यक असते. पण त्यामुळे ते कर्करोगाचा पूर्णपणे उपचार करू शकत नाही. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये योग्य औषधे आणि उपचारांना अत्यंत महत्त्व आहे.

कर्करोगाच्या उपचारानंतर मळमळ, वेदना आणि आजारपण येते

आयजेएमआर स्पष्टीकरण देते की प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक उपचाराचा प्रतिसाद वेगवेगळा असतो. सध्याच्या अत्याधुनिक उपचारात मळमळ आणि आजारपण असे दुष्परिणाम कमी प्रमाणात होतात. वेदना कमी करणारी औषधे आणि व्यायाम यामुळे लोकांना चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य मिळते.

म्हणूनच, कर्करोगाबद्दलचे अनेक गैरसमज दूर करायला हवेत. लोकांना कर्करोगाबद्दलच्या वास्तवाबद्दल संवेदनशील असायला हवे. लोकांची दिशाभुल करणे आणि अफवांनी घाबरवून टाकणे हे अजिबातच योग्य नाही. अति विचार आणि नकारात्मकता यामुळे अस्वस्थता वाढते. म्हणूनच आपण सर्वांनी फक्त वस्तुस्थितीच्या बाजूने उभे राहून या आपत्तीजनक आजाराशी लढण्यासाठी एकत्र येण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.