ETV Bharat / sukhibhava

Relationship Tips : ब्रेकअप झाल्यावर नवीन सुरूवात करायची आहे? मग फाॅलो करा 'या' टिप्स - Do plan for long weekend

जसे प्रेमात पडलेल्या माणसात अनेक बदल दिसू लागतात, तसेच ब्रेकअप झालेल्या व्यक्तीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल घडून येतो. कधी सकारात्मक बदल होतात तर कधी नकारात्मक बदल होतात. अनेकांना ब्रेकअप झाल्यावर आयुष्य थांबल्या सारखे वाटू लागते. पण ब्रेकअप झाल्यावर नवीन सुरूवात (new beginning after breakup) करायची असेल तर मग या टिप्स फाॅलो करा.

Make a fresh start after a breakup
ब्रेकअप झाल्यावर नवीन सुरूवात करा
author img

By

Published : Nov 4, 2022, 5:17 PM IST

जसे प्रेमात पडलेल्या माणसात अनेक बदल दिसू लागतात, तसेच ब्रेकअप झालेल्या व्यक्तीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल घडून येतो. कधी सकारात्मक बदल होतात तर कधी नकारात्मक बदल होतात. अनेकांना ब्रेकअप झाल्यावर आयुष्य थांबल्या सारखे वाटू लागते. जेव्हा आपण आपल्या पार्टनरसोबत असतो तेव्हा आयुष्य खूप सुंदर वाटायला लागते. पण जर काही कारणास्तव नाते तुटले तर आयुष्याचे सगळेच गणित बिघडल्यासारखे वाटते. जर कधी नात्याबद्दल निराशा वाटली तर घाबरण्याऐवजी पुढे जायचा विचार करावा.

आत्मविश्वासाने पुढे जावे: आपल्या नात्यातील कटू आठवणी विसरून पुढे जाण्यातच शहाणपण आहे, तरच तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगू शकाल. सर्वात आधी, तुमचे ब्रेकअप झाले आहे, हे स्वीकारा आणि दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत हे देखील स्वीकारा. तुमच्या मनात कोणते गिल्ट असेल तर ते काढून टाका आणि या गोष्टी लक्षात ठेवा.

अपयश वाटू शकते: आपण प्रेमात काही उगाच पडत नाही. एखादा माणूस आपल्या मनाच्या खूप जवळ येतो. आपल्या सहवासात सतत असतो. आपणही त्याला मनातले सगळ सांगतो, पण अचानक जेव्हा छोट्याश्या कारणाने ते नाते तुटते, तेव्हा आपण निराश होतो आणि आपल्याला हे खूप मोठे अपयश वाटू शकते.

स्वतःला दोष देण थांबवा: ब्रेकअपचे कारण काहीही असो, परंतु स्वतःला दोष देण थांबवा कारण याने तुम्हाला अस वाटेल की तुम्ही कुठेतरी कमी आहात आणि नातेसंबंध हाताळू शकत नाही.

प्रॅक्टीकली विचार करा: (Think Practically) ब्रेकअप हे माणसाला प्रॅक्टीकल बनवते. आजवर भावनेत अडकून पडलेला व्यक्ती ब्रेकअप मुळे ताळ्यावर येतो आणि त्याला कळते की कोणात जास्त अडकून राहणे हे आपल्यासाठीच धोकादायक आहे. कारण समोरच्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होत नाही पण आपल्याला खूप त्रास होतो.

फिरायला जावे: जर तुम्ही एका जागीच राहिलात तर तुम्ही त्याच व्यक्तीचा विचार करत राहाल आणि स्वतःला त्रास करून घ्याल. त्यापेक्षा जरा काही दिवस दुसरीकडे फिरायला (Do plan for long weekend) गेलात तर वातावरण बदलेल आणि तुम्हालाही जरा बरे वाटेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.