ETV Bharat / sukhibhava

Buddha Purnima : वैशाख पौर्णिमेला चुकूनही नका करू या तीन गोष्टी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

वैशाख पौर्णिमेला अनेकजण उपवास करतात, यावेळी वैशाख पौर्णिमा ही 5 मे रोजी साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त जाणून घेऊ. याशिवाय यादिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत, हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

author img

By

Published : May 4, 2023, 1:02 PM IST

Updated : May 5, 2023, 6:24 AM IST

Vaishakh Purnima 2023
वैशाख पौर्णिमा २०२३

नवी दिल्ली : वैशाख पोर्णिमेला अनेकजण उपवास ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी एक भौगोलिक घटना घडणार आहे. यात चंद्रावर पृथ्वीची सावली पडणार आहे. यामुळे चमकणारा चंद्र हा काहीसा धुसर दिसणार आहे. याला पेनम्ब्रल चंद्रग्रहण म्ह्टले जाते. पण या ग्रहणात कोणतेच सूतक राहणार नसून ही एक भौगोलिक घटना आहे, यामुळे चिंता करण्याची गरज नाही.

भगवान विष्णूंचा झाला होता नव्या अवतारात जन्म : भगवान विष्णूच्या 10 अवतारांमधील सर्वात प्रथम अवतार हा कूर्म अर्थात कासवाचा होता. जेव्हा दैत्य हिरण्यकश्यप पाताळात पृथ्वी घेऊन गेला होता, तेव्हा भगवान विष्णूने एका महाकाय कासवाचे रुप घेतले होते. त्यानंतर भगवान विष्णूंनी पृथ्वी परत आपल्या जागी आणली होती. याशिवाय भगवान विष्णू यांचा 9 वा अवतार मानले जाणारे भगवान बुद्ध यांचा जन्म देखील याच दिवशी झाला होता. ज्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धेतून लोकांना मुक्ती दिली होती. भगवान बुद्ध यांनी बौद्ध विचारांचा प्रचार केला. हा बौद्ध विचार भारतासह चीन, कंबोडिया, थायलँड, श्रीलंकेत पसरला आहे.

काय आहे वैशाख पौर्णिमेचे महत्त्व

  • वैशाख पौर्णिमा तिथीचा आरंभ - गुरुवार 4 मे 2023 रात्री 11 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल.
  • वैशाख पौर्णिमेची तिथी समाप्ती - शुक्रवार 5 मे 2023 रोजी रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी.
  • स्नान मुहूर्त - सकाळी 4 वाजून 12 मिनिटांनी ते सकाळी 4 वाजून 55 मिनिटांपर्यंत असेल.

हे आहेत वैशाख पौर्णिमेचे फायदे- वैशाख पौर्णिमेच्या दिवशी यमाच्या जाचातून सुटका मिळवायची असेल तर आपल्या पितरांच्या नावाने पाण्याचा हंडा दान केला पाहिजे. असे म्हटले जाते की, आपले पितर हे जेव्हा नरकात लोकातील तापलेल्या वाळूमधून चालत असतात, तेव्हा ते खूप अशक्त असतात. त्यामुळे पितरांच्या वंशातील लोकांनी पाण्याचा हंडा दान करावा. तसेच त्यांची त्या जाचातून मुक्ती व्हावी यासाठी भगवान विष्णू यांच्याकडे प्रार्थना करावी. या दिवशी पाणी, सरबतचे दान करणेदेखील खूप लाभकारी असते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचे एक विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही काही कारणाने नदीत स्नान करू शकले नाही तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करावे. असे केल्याने आपल्यावरील पाप नष्ट होत असतात, शिवाय आपले मन शुद्ध होत असते.

करू नका हे काम : वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. यामुळे ग्रहण लागत असते. इंग्रजी भाषेत याला पेनम्ब्रल चंद्रग्रहण म्हटले जाते. पण हे ग्रहण भारतीय लोकांना दिसणार नाही. या पौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवणाऱ्या नागरिकांनी काही कामे कधीच करू नयेत.

  • बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नये, असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होत असते.
  • यावेळी बुद्ध पौर्णिमा शुक्रवारच्या दिवशी आहे. या दिवशी आंबट पदार्थांचे सेवन करून नये. जर सेवन केले तर लक्ष्मी माता आपल्याला हवे ते फळ देत नाही.

हेही वाचा - Narasimha Jayanti 2023 : कधी आहे नरसिंह जयंती; काय आहे महत्व, जाणून घ्या...

Last Updated : May 5, 2023, 6:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.