मुंबई Sitaram Dalvi Passed Away : माजी आमदार सीताराम दळवी (MLA Sitaram Dalvi) यांचं निधन झालय. मनसे नेते संदीप दळवी (Sandeep Dalvi) यांचे ते वडिल होते. त्यांच्या पश्चात पत्नी शिला, मुलगा संदीप, मुलगी प्रतिमा आशिष शेलार, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्या तिकीटावर ते विजयी झाले होते. त्यापूर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक म्हणून ते विजयी झाले होते.
सीताराम दळवी यांचे राजकारण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिका पैकी एक सिताराम दळवी होते. शिवसेनेच्या उभारीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. तसंच विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबध होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस हे त्यांचं मूळ गाव आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथे अखेरपर्यंत ते वास्तव्यास होते. आज संध्याकाळी 6 वाजता अंधेरीतील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत होते.
शिवसेनेच्या तिकीटावर 1995 मध्ये पहिल्यांदा आमदार : सीताराम दळवी हे मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघातून 1995 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्याआधी त्यांनी मुंबई महापालिकेत नगसेवक म्हणून पद भूषवलं होतं. शिवेसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता.
हेही वाचा -