लंडन : कोरोनामुळे भारतासह जगभरातील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरल्याचे दिसून येते. अद्यापही कोरोनाची दहशत कमी झाली नसून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. दुसरीकडे मात्र लसीकरण झालेल्या नागरिकांना दीर्घ कोरोनाचा धोका निम्म्यावर कमी होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र लठ्ठ नागरिक, धूम्रपान करणाऱ्या नागरिकांसह ४० पार केलेल्या नागरिकांना दीर्घ कोरोनाचा धोका असल्याचेही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणाला होऊ शकतो दिर्घ कोरोनाचा धोका : लसीकरण केल्यामुळे कोरोनाचा धोका कमी होत असल्याचा दावा इस्ट अँग्लिया विद्यापीठाचे प्राध्यापक व्हॅसिलिओस व्हॅसिलिओ यांनी केला आहे. प्राध्यापक व्हॅसिलिओ यांनी ८ लाख ६० हजार रुग्णांवर संशोधन केले आहे. या संशोधनात त्यांनी कोरोनाचे लसीकरण केल्यामुळे लोकांचा दीर्घकाळ कोविड विकसित होण्याचा धोका कमी होतो. मात्र लठ्ठ नागरिक आणि स्त्रिया, धूम्रपान करणाऱ्या आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही दीर्घ कोविडचा त्रास होण्याची शक्यता असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यावरुन कोरोनाची लस घेतली तरी काही पथ्य पाळावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याव्यतिरिक्त दमा, मधुमेह, हृदयरोग, चिंता आणि नैराश्य यासारख्या आजाराने ग्रस्त नागरिकांनाही कोविडचा धोका वाढतो. ज्या रुग्णांना कोरोना संसर्गादरम्यान रुग्णालयात दाखल केले, त्यांनाही दीर्घ कोरोनाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याचेही या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
लसिकरण झालेल्या नागरिकांना कमी धोका : लसीकरण केलेल्या नागरिकांना लसिकरण न केलेल्या नागरिकांपेक्षा दीर्घ कोरोनाचा धोका निम्म्यावर कमी होत असल्याचा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे. ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील प्राध्यापक व्हॅसिलिओस व्हॅसिलिओ यांचे हे संशोधन जामा इंटर्नल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. हे संशोधन जगभरातील 41 अभ्यासांच्या डेटावर आधारित असून यामध्ये 8 लाख 60 हजार 783 रुग्णांचा समावेश आहे.
दिर्घ कोरोनाचे लक्षणे टिकतात १२ आठवडे : दीर्घ कोरोनाचे ही एक जटिल समस्या आहे. दीर्घ कोरोना कोरोनाच्या नंतर विकसित होते. दीर्घ कोरोनाची लक्षणे 12 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असल्याची माहितीही वॅसिलिओ यांनी सांगितले. दीर्घ कोविड लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो. यात श्वास लागणे, खोकला, हृदयाची धडधड, डोकेदुखी आणि तीव्र थकवा ही सर्वात प्रचलित लक्षणे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर इतर लक्षणांमध्ये छातीत दुखणे, निद्रानाश, चक्कर येणे, सांधेदुखी, नैराश्य आणि चिंता, भूक न लागणे, डोकेदुखी आणि वास किंवा चव यातील बदल यांचा समावेश असू शकतो, असेही वॅसिलिओ म्हणाले.
हेही वाचा - Natural immune system process : नैसर्गिक रोगप्रतिकारक प्रणाली प्रक्रिया; संक्रमणांवर करता येतात उपचार