ETV Bharat / sukhibhava

Heart Disease : तरुण वयात हृदयविकाराचा येतो झटका; आयआयटी मंडीच्या संशोधकांनी शोधली ही कारणे - सीव्हीडी

मंडी येथील आयआयटीच्या संशोधकांनी नागरिकांना हृदयविकाराचा आजार का होतो याबाबतच्या कारणांचा शोध घेतला. यावेळी या संशोधकांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हृदयविकाराचr धोकायक कारण सीव्हीडी ( Cardiovascular Diseases ) असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

Heart Disease
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 30, 2023, 4:07 PM IST

नवी दिल्ली : देशात तरुण वयात हृदयविकाराच्या आजाराने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आयआयटी मंडीच्या संशोधकांनी काही सूचना केल्या आहेत. आयआयटीच्या संशोधकांनी हृदयरोगाच्या कारणांचा शोध घेतला आहे. यात सीव्हीडी ( Cardiovascular Diseases ) हे जगभरातील नागरिकांच्या मृत्यूचे कारण असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. सीव्हीडीमुळे दरवर्षी सुमारे 17.9 दशलक्ष नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.

सीव्हीडीची अनेक धोकादायक आहेत कारणे : संशोधकांनी या आजाराची कारणे शोधण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भारतातील नागरिकांची माहिती गोळा केली. यात 45 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 59 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या डेटाचे विश्लेषण केले. यात मंडीच्या संशोधकांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हे संशोधन करंट प्रॉब्लेम्स इन कार्डिओलॉजी (एलसेव्हियर) - 'इम्पॅक्ट फॅक्टर 16.464' या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. आयआयटी मंडी येथील स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. रमन ठाकूर यांच्यासह त्यांच्या संशोधक विद्यार्थिनी गायत्री आणि सुजाता यांनी हा शोधनिबंध तयार केला आहे. सीव्हीडीची अनेक धोकादायक कारणे आहेत. यात उच्च सिस्टोलिक रक्तदाब, कमी एचडीएल कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, अवेळी खाण्याच्या सवयी, खराब पोषण, वय, सीव्हीडीचा इतिहास, कुटुंब, शारीरिक श्रम, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान आदी कारणे असल्याची माहिती डॉ. रमण ठाकूर यांनी यावेळी दिली. याशिवाय वायू प्रदूषणाचा उद्रेक हे देखील आणखी एक धोकादायक कारण असल्याचेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये सीव्हीडीचा प्रभाव : आम्ही या धोक्यांच्या घटकांचे वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ. ठाकूर यांनी यावेळी सांगितले आहे. भारतातील 45 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये सीव्हीडीवर प्रत्येक गटाचा प्रभाव शोधण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संशोधकांनी भारतातील लाँगिट्युडिनल एजिंग स्टडीमधील ( LASI ) डेटा वापरला. देशव्यापी रेखांशाच्या सर्वेक्षणात सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 73 हजार 396 व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यास भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आला. पहिल्या फेरीपासून डेटा गोळा करण्यात आला. यासाठी नोडल एजन्सीचे काम इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस मुंबई ( आयआयपीएस ) यांनी केले. डेटा गोळा केल्यानंतर संशोधकांनी अभ्यासात 45 आणि त्याहून अधिक वयाच्या 59 हजार 073 नागरिकांच्या या डेटाचे विश्लेषण केले.

पर्यावरण प्रदूषण धोकादायक कारण : भारतातील वृद्ध नागरिकांमध्ये सीव्हीडीच्या घटना आणि प्रगतीसाठी पर्यावरणीय प्रदूषण हा एक चिंताजनक घटक आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. हे नागरिक स्वयंपाक आणि इतर कारणांसाठी प्रदूषित इंधन वापरते. असे इंधन जाळल्याने घातक धूर निघतो. तो नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या धुराला सेकंडहँड स्मोक असे म्हटले जात असून तो हृदयाच्या धमन्यांना देखील हानिकारक आहे. हा धूर आपण धूम्रपान करण्याइतकाच धोकादायक असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Increase Obesity Risk In Children : गरोदर मातेला कोरोनाची लागण झाल्यास मुलांमध्ये वाढतो लठ्ठपणाचा धोका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.