हैदराबाद : सुप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा अपघात झाल्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे टायटॅनिक जाहाजाच्या अपघाताचा दिवस नागरिक कधीच विसरू शकत नाहीत. टायटॅनिक जहाज 10 एप्रिलला इंग्लंडमधील साऊथ हॅम्पटन येथून न्यूयॉर्कला सफरीवर निघाले होते. मात्र वाटेतच त्याचा अपगात झाला. त्यामुळे 15 एप्रिलला टायटॅनिकच्या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे नेमके काय होते टायटॅनिक जहाज, कशी झाली घटना याबाबतची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
बंदरातच टळला होता टायटॅनिकचा अपघात : इंग्लंडमधील साऊथ हॅम्पटन येथून 10 एप्रिल 1912 ला टायटॅनिक जहाज न्यूयॉर्क शहराकडे प्रवाशी भरुन सफरीवर निघाले होते. कॅप्टन स्मिथ या अनुभवी कॅप्टन हे जहाज घेऊन या सफरीवर निघाले होते. विशेष म्हणजे या सफरीनंतर कॅटन स्मिथ निवृत्त होणार होते. जहाजावर एकूण 2227 प्रवाशी प्रवास करत होते. साऊथ हॅम्पटन येथून बंदरातून बाहेर पडत असतानाच टायटॅनिकच्या जवळ उभे असलेले एसएस न्यूयॉर्क या जहाजाचा दोर तुटला होता. ते जहाज टायटॅनिकवर धडकणार होते. मात्र तो अपघात टाळण्यात कॅटन स्मिथला यश आले. एका टगबोटीने एसएस न्यूयॉर्कला केवळ चार मिटरच्या अंतरावरुन वळवण्यात यश आले.
असा झाला होता अपघात : टायटॅनिक जहाजाचा बंदरातून निघतानाच एसएस न्यूयॉर्क या जहाजासोबत अपघात टळला होता. त्यानंतर प्रवाशांना घेऊन पुढे निघालेले जहाज पुढे दोन ठिकाणी थांबले होते. जहाजावर प्रवाशांचे तीन वर्ग होते, यातील प्रथम वर्गाचे 329 प्रवाशी द्वितिय वर्गाचे 285 प्रवाशी आणि तृतीय वर्गाचे 710 प्रवाशांचा समावेश होता. मात्र यातील तिसऱ्या वर्गातील प्रवाशी सगळ्यात खाली होते. तर प्रथम श्रेणीतील प्रवाशी सगळ्यात वर होते. टायटॅनिक जहाज चार दिवसांनी 14 एप्रिल 1912 ला अटलांटीक महासागरातील एका हिमनगाला धडकले. ही धडक प्रचंड जबर होती. त्यामुळे जहाजातील तब्बल 1517 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. टायटॅनिक जहाजावर केवळ 1178 इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
हेही वाचा - Babasaheb Ambedkar Jayanti 2023 : जगात गाजावाजा ; जाणून घ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा इतिहास