ETV Bharat / sukhibhava

Pocket Friendly Date: अशाप्रकारे बनवा तुमची पहिली डेट पॉकेट फ्रेंडली! - first date pocket friendly

2021 मध्ये टिंडरने (tinder) आपल्या फ्यूचर ऑफ डेटिंग (future of dating) अहवालाद्वारे उघड केले की, जगभरातील सिंगल तरुण साध्या आणि सर्जनशील डेटींगला प्राधान्य देत आहेत. टिंडरच्या अनुसार तरूण डेटर्स पैकी 73 टक्के डेटर्स साध्या आणि स्वस्त डेटींगला प्राधान्य देत आहेत. तुम्‍हाला डेटींगला सुरुवात करण्‍यासाठी येथे काही प्रो टिप्स आहेत. (tips for Pocket Friendly Date).

Pocket Friendly Date
Pocket Friendly Date
author img

By

Published : Oct 29, 2022, 7:12 PM IST

नवी दिल्ली: आजकाल डेटींग करणे हे अत्यंत महागडे झाले आहे. 2021 मध्ये टिंडरने (tinder) आपल्या फ्यूचर ऑफ डेटिंग (future of dating) अहवालाद्वारे उघड केले की, जगभरातील सिंगल तरुण साध्या आणि सर्जनशील डेटींगला प्राधान्य देत आहेत. या वर्षी अनेक डेटिंग अॅप्सच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की त्यांचे सदस्य परवडणाऱ्या डेटींगकडे वळत आहेत. टिंडरच्या अनुसार तरूण डेटर्स पैकी 73 टक्के डेटर्स साध्या आणि स्वस्त डेटींगला प्राधान्य देत आहेत. तुम्‍हाला डेटींगला सुरुवात करण्‍यासाठी येथे काही प्रो टिप्स आहेत. (tips for Pocket Friendly Date).

निसर्गाच्या सानिध्यात लांब चालणे: समुद्रकिनारे आणि उद्याने सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तुमची पहिली डेट थोडी अधिक रोमँटिक बनवण्यासाठी तुम्ही काही स्वादिष्ट स्नॅक्ससह पार्कमध्ये किंवा समुद्राकिनाऱ्याजवळ संध्याकाळचा लांब फेरफटका मारू शकता. टिंडरने आपल्या युजर्सच्या बायोमध्ये 'लाँग वॉक'च्या उल्लेखांमध्ये दुपटीने वाढ झालेली पाहिली आहे.

Long walks
निसर्गाच्या सानिध्यात लांब चालणे

स्ट्रीट फूड एक्सप्लोर करा: असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. तुमच्या पार्टनरसोबत स्थानिक चाट-स्टोअरमध्ये जा आणि चविष्ट, मसालेदार अशा स्ट्रीट फुडचा आनंद घ्या. 42 टक्के टिंडर सदस्यांनी शेअर केले आहे की त्यांना विविध ठिकाणच्या नवनवीन फूड जॉइंट्स पाहणे आवडते.

Explore Street Food
स्ट्रीट फूड एक्सप्लोर करा

क्लासिक म्युझियम डेट: तुम्ही तुमची पहिली डेट तुमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच सर्जनशील बनवू शकता. जर तुम्हा दोघांनाही व्हिज्युअल आर्टमध्ये आवड असेल आणि भारताच्या समृद्ध इतिहासाबद्दल ओढ असेल, तर तुम्ही तुमची डेट एखाद्या म्युझियम मध्ये स्पेंड करू शकता. त्याचबरोबर डेटद्वारे तुमच्याजवळ असलेले ज्ञान आणि क्रियेटीव्हिटी सुद्धा पार्टनर सोबत शेअर करू शकता.

classic museum date
क्लासिक म्युझियम डेट

घरच्या जेवणासह डेट नाईट: तुम्ही तुमच्या आईच्या रेसिपी बुकमधून एक-दोन टीप्स घेवून घरच्या घरीच फॅन्सी जेवण बनवू शकता! तसेच तुम्‍ही तुमच्‍या पार्टनरला को-शेफ बनवून त्याच्यासोबत थोडं फ्लर्टींग देखील करू शकता. सोबतील उत्तम म्युझीक असेल तर ही डेट अधिकच रोमॅंटीक होवू शकते.

Home Cooked Meal
घरच्या जेवणासह डेट नाईट

स्ट्रीट शॉपिंग करा: जर तुमच्या खिशात फक्त 200 रुपये असतील तर पार्टनरला स्ट्रीट शॉपिंगला घेऊन जाणे कधीही फायद्याचे असते! आजकाल तरुणांच्या बायोमध्ये "थ्रीफ्टींग" म्हणजेच काटकसर याचा उल्लेख ५६ टक्क्यांनी वाढला आहे. तुम्ही तुमच्या पार्टनकला एखाद्या लोकप्रिय स्ट्रीट शॉपिंग मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकता आणि त्याचा फॅशन सेंस काय आहे हे देखील जाणून घेवू शकता.

thrift shops
स्ट्रीट शॉपिंग करा

विकेंडला ट्रेकिंगवर जाण्याचा प्रयत्न करा: जर तुम्ही दोघेही अॅडव्हेंचरस वृत्तीचे असाल तर ही डेट तुमच्यासाठीच आहे! तुम्ही तुमच्या डेटला एखाद्या मिनी-ट्रेकसाठी घेऊ शकता आणि सूर्योदय किंवा सूर्यास्त एकत्र पाहू शकता. डोंगरावर चढून नवीन मार्ग एकत्र एक्सप्लोर करा आणि नंतर थकल्यावर सोबत नाश्ता शेअर करण्यासाठी मात्र बिलकूल विसरू नका!

hike up a mountain
विकेंडला ट्रेकिंगवर जाण्याचा प्रयत्न करा

कलाप्रेमींची डेट: जर तुम्हा दोघांनाही कलेची आवड असेल तर तुम्ही तुमच्या डेटला आपल्या सोबत एखादी कला सादर करण्याकरीता बोलावू शकता. तसेच तुम्ही याला स्पर्धेचे रूपांतर देऊन आपल्या पार्टनरमधील स्पर्धात्मक बाजू देखील बाहेर आणू शकता.

कलाप्रेमींची डेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.