हैदराबाद - स्वयंपाक घरात वापरला जाणारा पुदीना हा सर्वात प्राचीन वनस्पतींपैकी एक आहे. पुदीन्यात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म देखील आहेत. पोटातील आणि शरीरातील हानीकारक वायू नष्ट करण्याचा गुण पुदीना या वनस्पतीमध्ये आढळतो.
पुदीनामध्ये अतिशय कमी कॅलरीज् असतात. तसेच यात प्रोटिन्स आणि फॅट्सचे प्रमाणसुद्धा अतिशय नगण्य असते. विटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्सचा साठा असलेला पुदीना त्वचा चांगली करतो व रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढवतो. रक्तातील हिमोग्लोबीन आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेले लोह, पोटॅशियम आणि मँगनीजसुद्धा पुदीनामध्ये असते, अशी माहिती अरब्रो फार्माचे संचालक सौरभ अरोरा यांनी दिली.
पुदीनाचे १० आरोग्यदायी गुणधर्म -
अन्न पचनासाठी उपयुक्त - पुदीनामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडन्टस् आणि पायथोन्यूट्रियन्टस् असतात. हे दोन्ही घटक शरीरातील अन्न पचनाची प्रक्रिया जलद करण्यास मदत करतात. पुदीनामध्ये असलेले नैसर्गिक तेल हे पोटदुखी, पोटातील विषारी वायू कमी करते.
अस्थमासाठी फायदेशीर -
नियमीत पुदीना खाल्ल्याने छातीमध्ये कफ साठवून राहत नाही. यात असलेला मेन्थॉल हा घटक डीसकन्जेस्टन्ट म्हूणन काम करतो. त्यामुळे छातीमध्ये साठलेला कफ पातळ होण्यास मदत होते व सर्दीमुळे बंद झालेले नाकही मोकळ होते. सर्दीसाठी पुदीना वापरताना त्याचे अतिसेवन करणे टाळावे नाहीतर श्वासनलिकेची आग होण्याची शक्यता असते.
डोकेदुखी करतो बरी -
पुदीनामधील मेन्थॉलमुळे स्नायू सैल होण्यास मदत होते. त्याचा रस कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. पुदीना वापरून तयार केलेले बाम देखील डोकेदुखीवर प्रभावी ठरतात.
ताण कमी करण्यात फायदेशीर -
पुदीना या वनस्पतीला तीव्र आणि ताजातवाना करणारा वास असतो. त्यामुळे शरीर आणि मन प्रसन्न होते. म्हणून ऑरोमाथेरेपीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पुदीन्यातील ऑप्टोजेनिक क्रिया रक्तातील कोर्टीसोल(हार्मोनचा प्रकार) पातळीचे नियमन करण्यास मदत करते, जी तणाव कमी करण्यासाठी शरीराच्या नैसर्गिक प्रतिक्रियाला चालना देते. पुदीनाच्या तेलाचा वास घेतल्यास अतिशय कमी वेळात तणाव कमी होतो.
त्वचा निरोगी बनवते -
पुदीनामध्ये दाहशामक आणि निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म आहेत. यात विपुल प्रमाणात असणाऱ्या सॅलीसायलिक अॅसिडमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते. अँटीऑक्सिडन्टमुळे पुदीना त्वचा स्वच्छ करण्यासाठी प्रभावी आहे. पुदीनामुळे त्वचा कोमल, स्वच्छ, ताजीतवानी होते.
मौखीक आरोग्य -
पुदीन्याची पाने चघळणे हे मौखीक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पुदीनातील तेलाच्या अर्कामुळे श्वासाची दुर्गंधी येत नाही. पुदीनाचा वापर असलेला माऊथवॉश वापरल्यास तोंडातील जीवाणू नष्ट होतात आणि हिरड्या व दात मजबूत होतात.
स्मरणशक्ती वाढवतो -
एका संशोधनानुसार पुदीनामुळे मेंदूच्या क्रिया जलद होण्यास मदत होते. नियमित पुदीना खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती वाढू शकते.
वजन कमी करण्यास उपयुक्त -
पुदीना पचनशक्तीचा वेग वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात राहते. पुदीना खाल्ल्यास जेवणातील पोषक तत्वे पूर्णपणे शरीरात शोषली जातात. जेव्हा पोषकद्रव्ये पूर्णपणे शरीरात जातात तेव्हा व्यक्तीचा मेटॅबॉलीजम दर वाढतो. परिणामी वजन कमी करणे सोपे होते.