हैदराबाद : हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. तर चहा पिण्याचं प्रमाण वाढते. सकाळी नाश्त्यासाठी चहा, जेवणानंतर चहा, संध्याकाळी चहा आणि पाहुणे आले तर आणखी एक चहा पिला जातो. जास्त चहा पिणे आरोग्यासाठी वाईट आहे. चहा ज्या पद्धतीने तो बनवला जातो तो आणखीच वाईट आहे. भारतात चहाची चव वाढवण्यासाठी त्यात दूध, साखर आणि अनेक प्रकारचे मसालेही वापरले जातात. त्यामुळे चहाची चव वाढते. पण शरीराला ते पिऊन फारसा फायदा होत नाही.
- रिकाम्यापोटी चहा पिणे : रिकाम्या पोटी चहा पिणे ही सर्वात मोठी चूक आहे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं चयापचय प्रक्रिया मंदावते. त्यामुळे अपचन, सूज येणे, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून नेहमी चहासोबत काहीतरी खा.
सर्वकाही एकत्र उकळणे : चहा बनवण्याची पद्धत म्हणजे सर्व साहित्य एका पातेल्यात एकत्र ठेवून जास्त वेळ उकळणे. असे मानले जाते की जास्त वेळ उकळल्यानं चहाची चव सुधारते. परंतु यामुळे चहा अजिबात आरोग्यदायी ठरत नाही. दुसरी गोष्ट जी आरोग्यास हानिकारक बनवते ती म्हणजे साखरेचा अधिक वापर करणे. चहात साखरेचं जास्त प्रमाणं असल्यानं फक्त लठ्ठपणा आणि ऍसिडिटी वाढवते. हे टाळण्यासाठी गुळाचा वापर करावा.
चहाचा गरम कप पिणे : चहा पिण्याचे शौकीन असलेले लोक एकदाच थोडा जास्त चहा करतात. तो गरम करून पुन्हा पुन्हा पितात. ही पद्धत आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. चहा पुन्हा गरम केल्यानं त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय मळमळ, जुलाब, पोट फुगणे, पोटदुखी यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.
( डिस्क्लेमर- वाचकांसाठी ही केवळ माहिती दिलेली आहे. त्याचा अवलंब करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
हेही वाचा :