हैदराबाद : सूर्य ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी, ज्योतिषशास्त्रातही ग्रहणाला खूप महत्वाचे मानण्यात येते. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. 20 एप्रिलला या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सकाळी दिसणार आहे. तर दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला दिसणार आहे. त्यामुळे जाणून घेऊ सूर्यग्रहणाची वेळ, सुतक काळ आणि या ग्रहणाचा काय अर्थ आहे, याविषयीची सविस्तर माहिती.
किती असेल सूर्यग्रहणाचा सुतक काळ : सूर्यग्रहणात काही महत्वाची कामे करण्यात येऊ नये, असे ज्योतिषशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रहणात कोणकोणत्या गोष्टी वर्ज्य करण्यात आल्या आहेत, सूर्यग्रहणात कोणत्या गोष्टी करण्यास मनाई करण्यात आल्या आहेत, त्याबाबतची माहिती जाणून घेण्याविषयी सगळ्यांना उत्सुकता असते. त्यासह ग्रहणाचा प्रभाव आणि सुतक कालावधी किती असतो, याबाबतही नागरिकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. सकाळी 7:04 वाजता या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू होणार असून ते सूर्यग्रहण दुपारी 12:29 वाजता संपणार असल्याची माहिती ज्योतिषशास्त्रज्ञांनी दिली आहे. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी किंवा सुतक कालावधी 5 तास 24 मिनिटे असणार आहे. त्यामुळे या पाच तासात नागरिकांना सूर्यग्रहण पाहण्यास मिळणार आहे.
कोणत्या परिसरात दिसेल सूर्यग्रहण : या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिलला दिसणार असल्याने नागरिकांना याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण दक्षिण हिंद महासागर आणि दक्षिण प्रशांत महासागर, चीन, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तैवान, अमेरिका, मायक्रोनेशिया, फिजी, जपान, सामोआ, सॉलोमन, बेरुनी, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि कंबोडिया सारख्या ठिकाणी दिसणार आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या वर्षातील दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत.
भारतात दिसणार नाही सूर्यग्रहण : या वर्षात दोन वेळा सूर्यग्रहणाच्या घटना दिसमार आहेत. यातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिलला दिसणार आहे. तर दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला आहे. मात्र दोन्ही वेळचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतीयांना या दोन्ही सूर्यग्रहणांचा सुतककाळ पाळण्याची गरज नसल्याचे ज्योतिषशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Change Of Weather Tips : वातावरणातील बदलांचा शरीरावर होतो विपरित परिणाम, जाणून घ्या कसा करावा बचाव