ETV Bharat / sukhibhava

प्रदूषित हवेत श्वासोच्छवास करणे मज्जासंस्थांसाठी धोकादायक, स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो - प्रदूषित हवेत श्वासोच्छवास करणे मज्जासंस्थांसाठी धोकादायक

हवेतील विषारी घटक रक्तप्रवाहातून प्रवास करतात. ज्यामुळे मेंदूचे विकार आणि मज्जासंस्थांना नुकसान होण्याची शक्यता असते. वेतील सूक्ष्म कण हे कशा प्रकारे शरीरात जातात याबद्दल वेगवेगळ्या संशोधनातून माहिती समोर आली आहे.

प्रदूषित हवेत श्वासोच्छवास करणे मज्जासंस्थांसाठी धोकादायक

author img

By

Published : Jun 22, 2022, 1:25 PM IST

प्रदूषित हवेत श्वासोच्छवास करणे मज्जासंस्थांसाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. हवेतील सूक्ष्म कण हे कशा प्रकारे शरीरात जातात याबद्दल वेगवेगळ्या संशोधनातून माहिती समोर आली आहे.

बर्मिंगहॅम युनिवर्सिटीच्या संशोधनातून आणि चायना रिसर्च युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून समोर आलयं की, हवेतील विषारी घटक रक्तप्रवाहातून प्रवास करतात. ज्यामुळे मेंदूचे विकार आणि मज्जासंस्थांना नुकसान होण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे विविध सूक्ष्म कण थेट रक्तातूनप्रवास करत असल्यामुळे ते काही अवयवांपेक्षा मेंदूमध्ये जास्त काळ राहतात.

बर्मिंगहॅम युनिवर्सिटीतील सह-लेखक प्राध्यापक इस्युल्ट लिंच यांच्या म्हणण्याप्रमाणे, "सूक्ष्म कणांचा मज्जासंस्थेवर होणाऱ्या हानिकारक प्रभावांबद्दल लोकांना अजून माहिती नाही. हवेतील सुक्ष्म कण हे रक्तप्रवाहाद्वारे फुफ्फुसातून मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. त्यांचा नाकातून थेट रक्तप्रवाहाद्वारे मेंदूपर्यंत जाण्याचा वेग हा आठपट आहे. ते सिद्ध करण्यासाठी वायुप्रदूषण आणि मेंदूवर अशा कणांचे हानिकारक परिणाम यांचे संबंधीत नवीन पुरावेही सापडले आहेत.

वायू प्रदूषण हे असंख्य विषारी घटकांचे मिश्रण आहे. यात विशेषतः PM2.5 आणि PM0.1 सारख्या अतिसूक्ष्म कणांचा समावेश असतो. आरोग्यावर हानीकारक प्रभाव करण्याच्या दृष्टीने ते सर्वात धोकादायक असतात. अतिसूक्ष्म कण, विशेषत:, सेंटिनेल रोगप्रतिकारक पेशी आणि जैविक अडथळ्यांसह शरीराच्या संरक्षणात्मक प्रणालींपासून दूर जाऊ शकतात. वाढत्या वायू प्रदूषणामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांमध्ये न्यूरोइंफ्लॅमेशन, अल्झायमरसारखे आजार उद्भवतात. यात स्मरणशक्तीवर परिणाम होणे अशा अजारांचा समावेश आहे.

संशोधकांच्या अभ्यासावरुन समोर आले आहे की, श्वासोच्छवासाद्वारे घेतलेले हवेतील कण रक्तातील पोकळ्यांचा अडथळा ओलांडत शेवटी मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाहाचा अडथळा निर्माण होतो. आसपासच्या ऊतींचे त्यामुळे नुकसान होते. त्यामुळे कण साफ करणे कठीण होते. त्यामुळे इतर कोणत्याही अवयवांपेक्षा जास्त काळ हवेतील कण मेंदूत राहतात.

हेही वाचा - इस्रायली शास्त्रज्ञांची एड्ससाठी नवीन अनुवांशिक उपचार पध्दती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.