टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या (टीएएमयू) कॉलेज स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे लक्षात आले आहे की, पालकाची भाजी ही नॉनजेनेटिक किंवा जेनेटिक कोलन कॅन्सर असणाऱ्या लोकांमध्ये पॉलीपची वाढ थांबवण्यास सक्षम आहे. शरीरात पालकच्या सेवनाने दिसून येणारे अँटी पॉलीप प्रभाव चयापचय अंत क्रियांमुळे उत्पन्न होतात, असे देखील संशोधनातून पुढे आले आहे. संशोधनाच्या निकालांनुसार, पालक कोलन पॉलिप्सचा विकास थांबवते, ज्यामुळे कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये कोलन कॅन्सर आणि रेक्टर कॅन्सरचा धोका भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतो.
कोलोरेक्टर कॅन्सर जगातील सर्वात प्रचलित कर्करोगाच्या श्रुंखलेत तिसऱ्या क्रमांकावर येतो. याच्या कारणांची चर्चा केल्यास, समान्यत: केवळ 10 ते 15 टक्के लोकांमध्ये आनुवंशिक म्हणजेच, आनुवंशिक कौटुंबिक कारणांना यासाठी जबाबदार मानले जाते. त्याचबरोबर, केवळ 5 ते 10 टक्के कोलोरेक्टल कॅन्सर हा पॉलिप्सच्या वाढीमुळे होतो.
टीएएमयू हेल्थ सायन्स सेंटरच्या या आभ्यासात पालकच्या कॅन्सर विरोधी गुणांची पृष्टी करण्याबरोबरच, पालक फायदेशीर परिणामांसाठी आतड्यांचे जिवाणू आणि आनुवंशिकतेसह कसे कार्य करते, याचा देखील अभ्यास करण्यात आला होता.
अभ्यास पत्रिका गट माइक्रोब्समध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनासाठी संशोधकांनी 26 आठवड्यांपर्यंत कोटुंबिक एडिनोमेटस पॉलिपोसिस असणाऱ्या उंदरांना गोठवलेला (frozen) वाळलेला पालक खायला दिला होता. आभ्यासात या उंदरांच्या शरीरात पॉलीपच्या विकासात उशीर झाल्याचे दिसून आले. या आभ्यासातून पॉलीपची वाढ कमी करण्यात पालक इतका प्रभावी का होता? हे समजण्यासाठी संशोधकांनी मल्टी - ओमिक्स नावाची डेटा चालित पद्धती वापरली होती. मल्टी - ओमिक्स शरीरातील विविध प्रणालींच्या डेटाचे विश्लेषण करते आणि संशोधनाची संभाव्य क्षेत्रे सुचवू शकतील अशा संघटना शोधते.
या अध्ययनात संशोधकांनी तीन प्रणालींच्या नमुन्यांचे विश्लेषण केले :
1) माइक्रोबायोम - लाभदायक आणि हानिकारक आतडे जंतू
2) प्रतिलेख - आरएनए आणि एमआरएनएचे संग्रह, जे पेशी किंवा उती (ऊतक) व्यक्त करतात.
3) उपापचयी - उपापचयी क्रियेदरम्यान पेशी ज्या उपापचयी पदार्थ उत्पन्न करतात.
टीएएमयूच्या इंटिग्रेटेड मेटाबोलॉमिक्स अनालिसिस कोरने संशोधनादरम्यान आणि त्यानंतर उदरांच्या चयापचय (metabolic) क्षमतेचे विश्लेषण केले होते, ज्याच्या निकालात संशोधकांनी उदरांमधील पॉलिप्सची वाढ दडपून टाकण्याच्या पालकच्या क्षमतेची पृष्टी केली होती.
संशोधनाचे वरिष्ठ अन्वेषक डॉ. रोडरिक डॅशवुड यांनी संशोधनाचे विश्लेषण आणि परिणामांबाबत माहिती देताना सांगितले की, संशोधनात क्लोरोफिलच्या भूमिकेचा आभ्यास हा मुख्य केंद्रबिंदू होता. कारण, क्लोरोफिलमध्ये अँटी कॅन्सर परिणाम आढळतात, मात्र संशोधनात याच्या व्यतिरिक्त बहू - ओमिक्स दृष्टिकोणाने संशोधनाच्या परिणामांना प्रेरित केले.
संशोधकांनी आपल्या पशू मॉडेलमध्ये लिनोलिक अॅसिड मेटाबोलाइट्स आणि शॉर्ट - चेन फॅटी अॅसिडच्या अँटी कॅन्सर गुणांचा तपास करण्याची योजना बनवली होती, ज्यांच्या परिणामात विशेषत: मेटाबॉलिक डेटामध्ये असे समोर आले की, फॅटी अॅसिड आणि लिनोलिक अॅसिड डेरेवेटिव्ह खूप फायदेशीर परिणाम निर्माण करू शकतात.
हेही वाचा - बागेतील झाडांची काळजी कशी घ्यावी सुचेना? मग 'ही' माहिती वाचाच