कर्करोग हा एक अत्यंत गुंतागुंतीचा रोग आहे आणि सिद्धार्थ मुखर्जी यांनी त्याला सर्व आजारांचा सम्राट म्हटले आहे. दर वर्षी कोट्यवधी लोक कर्करोगाने मरण पावतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोठी प्रगती होऊनही, सर्वांना वाचवू शकेल असा उपचार अद्यापि आपल्याला मिळालेला नाही.
कर्करोग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पेशी समजून घेतली पाहिजे. पेशी शरीरातला छोटा भाग आहे. म्हणजे भिंतीत वीट असते तसा. या पेशी टिश्युज आणि अवयव तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापन करत असतात. जिन्सप्रमाणे या पेशी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. परिपक्व झालेल्या लाल पेशी सोडल्या तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींमध्ये २०००० – २५००० जिन्स असतात. तो डीएनएचा कार्यक्षम विस्तार आहे.
प्रत्येक जनुकामध्ये गाभा असतो. प्रथिने आणि एंजाइम, रिसेप्टर्स, लिगँड इत्यादी जटिल प्रणालीचे एकीकरण करण्यासाठी निर्देश असतात. पेशीमध्ये कार्यशील घटक असतात. पण प्रथिनांवरच गोष्ट थांबत नाही. या प्रथिनांची कार्ये चयापचय क्रियेस चालना देतात आणि अनेक चयापचय क्रियांचे एकीकरण करतात. या चयापचय क्रिया प्रथिने आणि इतर बायोमोलेक्युल्ससह पेशींना त्यांचे कार्य करण्यास मदत करतात. पुढे या साध्या पेशीचे ठराविक वेळी अनेक वेळा विभाजन होऊ शकते.
जेव्हा एखाद्या पेशीला कोणताही तणावपूर्ण वातावरणीय संकेत किंवा सिग्नल आढळतो, तेव्हा ती जटिल प्रथिने सिग्नलिंग आणि मेटाबोलिट्सच्या आधारे त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. परंतु जेव्हा तणाव पातळी विशिष्ट मर्यादा ओलांडते तेव्हा पेशी स्वत:हून मृत होते किंवा त्रुटी सुधारण्यासाठी निर्णय घेऊ शकते किंवा सेल्युलर विभागणी थांबवू शकते. कोणत्याही प्रणालीप्रमाणे, सेल्युलर सिस्टम देखील त्रुटीपासून मुक्त नसते आणि किंचित बदलांसाठी संवेदनशील असते.
जर आपण कर्करोगाच्या संदर्भात पेशीच्या अस्वाभाविक कार्याबद्दल बोललो तर ते अनुवंशिक आहे. कोणत्याही जिवंत प्रणालीचे कार्य म्हणजे वातावरण आणि जिन्स यांच्या एकमेकांबरोबरच्या क्रिया प्रतिक्रिया असतात. म्हणूनच, जनुकातील बदल (परिवर्तन) धूम्रपान, मद्यपान, तंबाखू आणि कीटकनाशके इत्यादी कारणांमुळे होऊ शकतो. किंवा काही चुका असू शकतात. किंवा विभाजनाच्या वेळी झालेली चूक असू शकते. आपल्याला माहीत आहे की पेशी निश्चित संख्येसाठी विभागू शकतात. पण कर्करोगाची पेशी अनिश्चित काळासाठी विभागू शकते. यामुळे अनेक पेशी निर्माण होतात आणि त्यांना ट्युमर म्हटले जाते. म्हणूनच कर्करोगामध्ये जनुकांच्या पातळीवर आपल्या सर्वसामान्य पेशीमध्ये काही तरी गफलत होते. आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक पेशीमध्ये २०००० - २५००० जनुके आहेत. कर्करोगात शेकडो जनुके बदलू शकतात. कर्करोगाचे विविध प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या घटकांमुळे आहेत. उदाहरणार्थ, फुफ्फुसाचा कर्करोग हा सिगारेटच्या धुरामुळे होऊ शकतो, पण यकृताचा कर्करोग सहसा अल्कोहोलमुळे होतो.
एक सर्वसामान्य प्रश्न मनात डोकावतो, तो म्हणजे कर्करोगावर उपचार पद्धती का नाही ? कर्करोगावर अनेक उपचार पद्धती आहेत, पण सर्व औषधे ( केमोथेरपी ) १०० टक्के प्रभावी नाहीत. आणि प्रत्येक रुग्णाप्रमाणे त्याचा प्रभाव वेगळा असतो. अनुवंशिकदृष्ट्या आपण सगळेच एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. ( त्यामुळेच आपण एकमेवद्वितीय असतो ) म्हणूनच एकच प्रकारचा कर्करोग असला तरी समान औषधांचा परिणाम वेगवेगळा दिसतो. अर्थात, हेच अंतिम चित्र नाही आणि आपली जीवनशैली, आहार, व्यायाम वेगळे असते. किंवा मधुमेह, एड्ससारखे आजार असल्यामुळेही औषधांचा प्रभाव प्रत्येक रुग्णावर वेगवेगळा होतो.
आणखी एक प्रश्न सतत पडतो, तो म्हणजे कर्करोगात ठराविक स्टेजीस का असतात ? आपण नेहमी ऐकतो, कर्करोगाची पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी स्टेज. या स्टेजीस किंवा टप्पे का आहेत आणि तिसऱ्या, चौथ्या स्टेजमध्ये कर्करोग बरा होणे का कठीण असते ? आता आपल्याला हे माहीत आहे की कर्करोगाच्या पेशीकडे विभाजन होण्याची क्षमता असते. त्यांचे रूपांतर ट्युमरच्या गोळ्यात होते. हा ट्युमर ठराविक आकारात विकसित होतो. आणि तो जेव्हा लहान आणि ठराविक भागात आढळतो तेव्हा ती कर्करोगाची पहिली किंवा दुसरी स्टेज असते. ट्युमरचा आकार वाढत जातो, तसा या पेशी पसरायला लागतात. दुसरीकडे जवळपास जाऊन वसाहत करू लागतात. याला कर्करोगाची दुसरी आणि तिसरी स्टेज म्हटले जाते. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजमध्ये पेशी शरीरातल्या दुसऱ्या अवयवात वस्ती करू लागतात. उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग मेंदूपर्यंत जातो. आता आपल्याला हे चांगलेच समजू शकते की एका ठिकाणी छोट्या आकारातली गोष्ट सहज काढता येऊ शकते. पण शरीरातल्या अनेक भागांत पसरलेला तो घटक काढून टाकणे अवघड आहे. म्हणूनच कर्करोगाच्या शेवटच्या अवस्थेत उपचार करणे कठीण आहे. कर्करोगाच्या उपचार पद्धतीत रेडिएशन, औषधे आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश असतो.
डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून, कर्करोग हा अशा आजारांपैकी एक आहे ज्याने बोर्ड, शल्यचिकित्सक आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना नम्र केले आहे. कर्करोग हा आजार एकटा डॉक्टर बरा करू शकत नाही. त्यात बऱ्याच कमतरता आढळल्या. त्यासाठी आरोग्यसेवक, संशोधक हे सगळे मिळूनच या आजारावर उपचार करू शकतात. कर्करोगावर एकच तज्ज्ञ डॉक्टर उपचार करतो, ते दिवस आता संपले. आज देशातील दुर्गम भागातही ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घेतलेला कोणताही कर्करोगाचा रुग्ण याची खात्री बाळगू शकतो की नंतर त्याला अनेक तज्ज्ञांच्या पॅनेलचा सल्ला मिळणार आहे. या पॅनलमध्ये सामान्य चिकित्सक, सर्जन, केमो-थेरपिस्ट, रेडिओथेरेपिस्ट असतात. इतकेच नाही तर इम्युनोलाॅजिस्टही असतो. ( हा कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्याचा प्रयत्न करतो ).
चांगली बातमी इतकीच नाही. कोविड १९ मुळे कर्करोगाच्या अत्याधुनिक उपचार पद्धतीसाठीचा निधी जरी कमी झाला असला तरीही वैद्यकीय क्षेत्राने प्रिशियस आणि पर्सनलाइझ्ड मेडिसिन ( पीपीएम ) तयार करण्यात आणि नॉन-इंटरव्हेन्शनल थेरपीमध्ये मोठी उडी घेतली आहे. पीपीएममध्ये रुग्णाची अनुवंशिकता, आधीचे आरोग्य आणि कर्करोगाला कारणीभूत असलेले घटक पाहून उपचार दिले जातात आणि त्याचे फारसे दुष्परिणामही नसतात.
दुसऱ्या बाजूला प्रोटॉन लेसर थेरपीसारखे तंत्रज्ञान कर्करोगाला मारून टाकते. यात ट्युमरच्या पेशींना लक्ष्य करून मारले जाते आणि इतर पेशींना इजाही पोचत नाही. अशा महत्त्वाच्या उपचार पद्धती सुरू झाल्यामुळे आता मेंदू, डोळे आणि प्रोस्ट्रेट यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना कमकुवत बनवणाऱ्या शस्त्रक्रिया आता भूतकाळ झाला. यामुळे उपचार पद्धतीनंतरही उत्तम प्रकारे प्रगती होऊ शकते.
हे इथवर थांबत नाही. कर्करोगातून बरा झालेला कुणीही व्यक्ती सांगेल की हा संघर्ष फक्त शारीरिक नाही तर मानसिकही असतो. मृत्यूची भीती, उपचाराचे दुष्परिणाम, तणाव, उपचाराचा खर्च या सगळ्या गोष्टी सतत मनात असतात. शिवाय आपण आपल्या कुटुंबावर भार होणार नाही ना, हेही रुग्णाला सतावत असते. यावर उपाय म्हणजे उपचारासाठी चांगल्या प्रतीचे केअर माॅडेल असणे.
या केअर गिव्हर पॅनलमध्ये सल्लागार, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट असतात. ते रुग्णाला उपचार देतात. यामुळे रूग्णांच्या रोगनिदानात मोठ्या प्रमाणात सुधारणा होतेच, ( पश्चिमेकडील एनोवा हेल्थ केअरने सिद्ध हे केले आहे ) पण विमा भरणाऱ्यांसाठीही ते किफायतशीर पडते. यामुळे त्रास कमी होतो आणि प्रगत टप्प्यात प्रगती होते.
- पियुष प्रसाद, सहसंशोधक, सर गंगा राम हॉस्पिटल
- डॉ. नदीम अहमद, आरोग्यसेवा सल्लागार आणि आपत्कालीन डॉक्टर