ETV Bharat / sukhibhava

हिवाळ्याच्या काळात तुम्हालाही चिंता आणि तणाव जाणवतोय? हे करून पाहा - तणाव

Seasonal Depression : हिवाळा हंगाम सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये लोकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतं. हिवाळ्यात आपलं खाणंपिणं पूर्णपणे बदलून जातं. बदलत्या हवामानात अनेक लोक तणावाचे आणि नैराश्याचे बळी ठरतात. त्यामुळं काही सवयी लावून तुम्ही तणावापासून मुक्ती मिळवू शकता.

Seasonal Depression
चिंता आणि तणाव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 11:07 AM IST

हैदराबाद : थंडीच्या मोसमात लोक तणाव आणि चिंतेचे शिकार होतात. या ऋतूमध्ये आपली जीवनशैली बदलते, ज्यामुळं अनेक आरोग्य समस्यांचा धोका असतो. बदलत्या हवामानाचा लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. थंडीच्या काळात लोक तणावग्रस्त होतात. त्याला हिवाळ्यातील उदासीनता असेही म्हणतात. हे हवामान लोकांना नैराश्य आणि तणावग्रस्त बनवू शकते. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काही सवयी तुम्ही अवलंबू शकता.

हिवाळ्यात तणावमुक्तीसाठी या योग्य सवयींचा अवलंब करा:

  • शारीरिक हालचाली करा : हिवाळ्यात लोक बहुतेक वेळा अंथरुणावरच असतात. असं केल्यानं तुम्ही आळशी होऊ शकता. त्यामुळं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी तुम्ही दररोज शारीरिक हालचाली करणं आवश्यक आहे. हे तुम्हाला तणावाच्या समस्या टाळण्यास मदत करेल.
  • आरोग्यदायी सवयी लावा : तणावाच्या समस्या टाळण्यासाठी चांगल्या सवयी लावा. स्वत:ची काळजी घेण्यासारख्या सवयी तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि हिवाळ्याच्या तणावापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. सोशल मीडियाचा वापर कमी करा आणि ताणतणाव कमी करण्यासाठी पोषक अन्नपदार्थ खा.
  • लोकांशी संपर्क साधा: हिवाळ्याच्या हंगामात, लोक अधिक एकटे असतात, ज्यामुळं लोक त्यांच्या मित्र आणि कुटुंबापासून दूर जातात. एकटं राहणं तुम्हाला तणावाच्या समस्यांना बळी पडू शकतं. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. हिवाळा हंगाम आपल्या मित्र आणि प्रियजनांसह घालवा. यामुळं तुम्हाला तणावाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
  • हिवाळ्यात जगण्याची सवय लावा : हिवाळा आला की अनेक बदल होतात. या ऋतूमध्ये जीवनशैलीपासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्वच गोष्टी बदलतात. बहुतेक लोक अशा बदलांमुळे अस्वस्थ आणि तणावग्रस्त असतात. याच्या मदतीने तुम्ही तणावापासून आराम मिळवू शकता.
  • शरीराला सूर्यप्रकाश मिळू द्या : हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता भासते. त्यामुळे तुम्हीही काही काळ उन्हात राहावे. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन-डीचा चांगला स्रोत आहे. यामुळे तणाव कमी होण्यास खूप मदत होते.

हेही वाचा :

  1. हिवाळ्यात फ्रीजचं टेंपरेचर किती असावं ? जाणून घ्या
  2. वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत, 'हे' आहेत कच्ची केळी खाण्याचे फायदे
  3. हिवाळ्यात गुळासोबत खा 'हे' पदार्थ; होणार नाही कोणताच आजार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.