ETV Bharat / sukhibhava

Role Of Counselling In Cancer Patient : कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णाला समुपदेशनासह भावनिक, मानसिक आधाराची असते गरज - समुपदेशन

कर्करोगाच्या रुग्णाला मानसिक आणि भावनिक आधाराची गरज असूनही ती पूर्ण होत नाही. देशातील ६० लाख रुग्णांना समुपदेशनाची गरज असतानाही केवळ २ टक्के रुग्णांना समुपदेशनाची सेवा मिळते. वेळेवर समुपदेशन न मिळाल्याने कर्करोगाचे रुग्ण निराश होऊन उपचाराला प्रतिसाद देत नाहीत.

Role Of Counselling In Cancer Patient
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 17, 2023, 11:14 AM IST

नवी दिल्ली : कर्करोग हा त्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्यावर रुग्णाला भावनिक आणि मानसिक आधाराची गरज असते. त्यासाठी समुपदेशनाची भूमीका मोलाची असल्याचे मानले गेले आहे. कर्करोग रुग्णाला अखेरच्या टप्प्यात समुपदेशनामुळे मानसिक आधार दिल्याने रुग्णाची इच्छाशक्ती दृढ होते. मात्र एखाद्या वृद्ध रुग्णाला त्याच्या कर्करोगाच्या अंतिम टप्प्यातील निदानाबद्दल माहिती असल्यास ते निराश होतात. त्यामुळे समुपदेशकांनी अशा रुग्णांना आधार देणे गरजेचे ठरते.

कर्करोगाचे ६० टक्के रुग्ण बरे न होणारे : सध्या मोठ्या शहरात कॅन्सरच्या उपचारांच्या चांगल्या सुविधांच्या उपलब्ध आहेत. मात्र तरीही ६० टक्के कर्करोगाचे रूग्ण असाध्य अवस्थेत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. कर्करोगाच्या रुग्णांचे जीवनमान आणि जगण्याचा दर सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देणे आहे. त्यामुळे या सेवांमध्ये समुपदेशन महत्वाची भूमीका बजावू शकतात.

कर्करोगाच्या ६० लाख रुग्णांना समुपदेशनाची गरज : देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र त्याप्रणाणात आरोग्य यंत्रणेकडे औषधांची उपलब्धता नाही. दुसरीकडे अखेरच्या टप्प्यात असलेल्या ६० लाख कर्करोग रुग्णांना समुपदेशानाची गरज आहे. मात्र यातील केवळ दोन टक्के रुग्णांना समुपदेशनाची सुविधा मिळते. त्याचे कारण म्हणजे हव्या त्या संख्येने समुपदेशन केंद्रे, प्रशिक्षित समुपदेशक, परिचारिका उपलब्ध नाहीत. त्यातही केवळ 3 टक्के कर्करोग रुग्णांना ओपिओइड्स (पेन किलर) ची उपलब्ध नाहीत. त्यामुळे समुपदेशन गरज आणि उपलब्धता यामध्ये बरेच अंतर आहे. बहुतेक वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय प्रशासक आणि जनतेला समुपदेशन म्हणजे काय हे माहित नसल्याची धक्कादायक माहितीही आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन उघड झाली आहे.

समुपदेशनाची काय असते भूमिका : मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन तज्ञांची एकत्रितपणे केवळ रुग्णांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील काळजी घेणाऱ्यांना भेडसावणाऱ्या भावनिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक अडचणींपासून आधार देण्यात महत्त्वाची भूमिका असते. व्यवस्थापन सुरू करण्यापूर्वी रुग्णांना सर्वात जास्त काय त्रास होत आहे. त्यांच्या गरजा आणि इच्छा याविषयी मूल्यांकन केले पाहिजे. कुटुंबातील सदस्यांशी त्यांची वागणूक, परस्पर संबंध आणि सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वासांबद्दल समुपदेशकांनी चर्चा करणे देखील आवश्यक असल्याचे यावेळी तज्ज्ञ स्पष्ट करतात.

हेही वाचा - Covid Impact On Teens Mental Health : कोरोनाचा बालकांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम ; लॅन्सेटचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.