ETV Bharat / sukhibhava

मुलांना कोरोना होण्याची भीती वाटतंय? रिसर्च म्हणते...

बहुतांश तज्ज्ञ आणि डॉक्टर अशी पुष्टी करतात की, मुलांमध्ये मोठ्यांच्या तुलनेत कोरोना संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असते. इतकेच नव्हे तर, सामान्यत: मुलांमध्ये कोरोनाचे गंभीर परिणाम देखील दिसून येत नाही आणि ते लवकर बरे होतात. अलिकडेच लॅन्सेट चाइल्ड अँड एडोलिसेंट हेल्थ जर्नलमध्ये किंग्स कॉलेज लंदनच्या संशोधकांनी देखील या बाबीची पुष्टी केली आहे. या अभ्यासात, मुलांमध्ये दीर्घकाळापर्यंत कोविड 19 संसर्गाची लक्षणे खूप कमी दिसून येतात, असे समोर आले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Sep 28, 2021, 4:44 PM IST

लॅन्सेट चाइल्ड अँड एडोलिसेंट हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, मुलांमध्ये दीर्घ काळापर्यंत कोरोनाची लक्षणे दिसून येण्याची शक्यता फार कमी असते. या आभ्यासासाठी कोरोना पीडित मुलांचे आई - वडील आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांद्वारे अ‍ॅपच्या माध्यमातून शेअर केलेल्या डेटाच्या आधारावर आकडे तयार करण्यात आले होते.

किंग्स कॉलेज लंदनच्या संशोधकांद्वारे करण्यात आलेल्या या शोधानुसार लाँग कोविड किंवा दीर्घ काळापर्यंत कोरोनाची लक्षणे किंवा पार्श्व परिणामांचा अनुभव घेणाऱ्या मुलांची संख्या तुलनेने कमी असते. तेच तुलनात्मक आभासाबाबत बोलल्यास, प्रौढांमध्ये लाँग कोविड आणि संसर्गाचे पार्श्व परिणाम दीर्घ काळापर्यंत दिसत राहतात.

या आभ्यासात ब्रिटेनच्या 5 ते 17 वर्षे वयोगटातील त्या 2.5 लाख मुलांचा समावेश करण्यात आला होता जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये आयोजित झालेल्या या संशोधनात असे दिसून आले की, या दरम्यान 1 हजार 734 मुलांना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात हळू हळू कोरोनाची लक्षणे विकसित होण्यास सुरुवात झाली होती. संशोधनादरम्यान संसर्ग झालेल्या मुलांच्या निरीक्षणातून असे समोर आले की, बहुसंख्य मुलांमध्ये 6 दिवसांमध्ये संसर्गाची लक्षणे कमी होत होती आणि ते लवकर बरे देखील झाले.

कोरोना संसर्ग झालेली बहुसंख्य मुले जवळजवळ 4 आठवड्याच्या आत पूर्णत: बरी झाली होती, म्हणजेच त्यांच्यातील कोरोनाची लक्षणे समाप्त झाली होती. मात्र, यातील काही मुले अशी देखील होती ज्यांमध्ये या कालावधीत म्हणजेच, एक महिन्यानंतर संसर्गाची काही लक्षणे दिसून येत होती, परंतु या मुलांमध्ये देखील प्रौढांच्या तुलनेत संसर्गाचा प्रभाव आणि त्याची लक्षणे खूप कमी होती.

आभ्यासात असे दिसून आले की, कमी कालावधीत संसर्गाने बरे झालेल्या मुलांमध्ये सामान्यत: कोरोनाचे पार्श्व परिणाम अधिक दिसून आले नाही, मात्र ज्या मुलांमध्ये संसर्गाचे परिणाम एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत होते त्यांना दुसऱ्यांच्या तुलनेत अधिक थकवा आणि शारीरिक अशक्तता वाटत होती.

हेही वाचा - स्तन सुडौल करण्यासाठी 'हे' व्यायाम ठरू शकतात फायदेशीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.