ETV Bharat / sukhibhava

Women Reduce Risk Intake Of Protein : प्रथिनांच्या नियमित सेवनाने महिलांना हिप फ्रॅक्चरचा धोका होतो कमी, 'या' संशोधकांचा दावा

लिड्स विद्यापीठातील फूड सायन्स विभागातील प्राध्यापकांनी संशोधन केले आहे. या संशोधनातून महिलांनी प्रथिनांचे नियमित सेवन केल्यांने त्यांना हिप फ्रॅक्चरचा धोका कमी असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

अशा महिलांना हिप फ्रॅक्चरचा धोका होतो कमी :

author img

By

Published : Feb 22, 2023, 5:21 PM IST

लिड्स : नियमितपणे प्रथिनांच्या सेवनासह एक कप चहा किवा कॉफी पिल्याने महिलांमध्ये हिप फ्रॅक्चरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. हे संशोधन लिड्स येथील विद्यापीठाच्या फूड सायन्स विभागातील संशोधकांनी केले आहे. या संशोधनानुसार महिलांच्या प्रथिनांमध्ये एक कप चहा किवा कॉफीमुळे दररोज 25 ग्रॅम वाढ होते. तर त्यांच्या हिप फ्रॅक्चरच्या धोक्यामध्ये सरासरी 14 टक्के घट होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. अतिरिक्त चहाचा किवा कॉफीचा एक कप हिप फ्रॅक्चरचा धोका 4 टक्के कमी करत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

अशा महिलांना हिप फ्रॅक्चरचा धोका होतो कमी : कमी वजन असलेल्या महिलांच्या संरक्षणात्मक फायदे जास्त असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. दररोज प्रथिने २५ ग्रॅमने वाढल्याने अशा महिलांना हिप फ्रॅक्चरचा धोका ४५ टक्के कमी होत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. प्रथिने कोणत्याही स्वरूपात घेता येऊ शकतात. यात मांस, दुग्धजन्य पदार्थ किंवा अंडी आणि शेंगदाणे, शेंगा यातूनही प्रथिने मिळू शकत असल्याचे या संशोधकांनी नमूद केले आहे. शुद्ध शाकाहारी महिलांसाठी ही प्रथिनांचे अनेक स्त्रोत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. आहारातील तीन ते चार अंडी सुमारे 25 ग्रॅम प्रथिने देतात. 100 ग्रॅम टोफू सुमारे 17 ग्रॅम प्रथिने प्रदान करेल असेही या संशोधकांचे मत आहे. या संशोधकांनी केलेल्या अभ्यास गटातील फक्त 3 टक्के पेक्षा जास्त स्त्रियांना हिप फ्रॅक्चरचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे.

काय आहे संशोधन : या संशोधकांनी २६ हजार पेक्षाही जास्त मध्यम वयीन महिलांचा अभ्यास केला आहे. या संशोधनात महिलांच्या आहार आणि आरोग्यातील घटकांचा संबंध ओळखला गेला. मात्र त्याचे थेट परिणाम पुढे आले नसल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. ज्या महिलांनी नियमितपणे प्रथिनांच्या सेवनासह एक कप चहा किवा कॉफीचे सेवन केले आहे, अशा महिलांमध्ये हिप फ्रॅक्चरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

अन्न, पोषक आणि हिप फ्रॅक्चर धोका : मध्यमवयीन महिलांचा संभाव्य अभ्यास - 26,000 पेक्षा जास्त महिलांच्या मोठ्या निरीक्षण विश्लेषणावर आधारित आहे. एक निरीक्षणात्मक अभ्यास म्हणून, संशोधकांनी महिलांचानियमीत आहार आणि आरोग्यातील घटकांमधील संबंध याचे निरीक्षण केले. ते निरीक्षण ओळखण्यास संशोधक सक्षम होते मात्र तरीही ते थेट कारण आणि परिणाम ओळखू शकले नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या

हिप फ्रॅक्चरमुळे अनेक महिला ग्रस्त : या अभ्यासाचे नेतृत्व लीड्स येथील स्कूल ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशनविभागाचे संचालक संशोधक जेम्स वेबस्टर यांनी केले. यावेळी त्यांनी जगभरात, हिप फ्रॅक्चरमुळे महिलांच्या आजारांवर होणारा खर्च प्रचंड आहे. या आजारामुळे अनेक महिला ग्रस्त आहेत. त्यामुळे अनेक महिला इतरांवर अवलंबून असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर या आजारामुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यूकेमध्ये एनएचएसचा वार्षिक खर्च 2 ते 3 बिलियन डॉलर दरम्यान असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - Dental Problems In Children : चिमुकल्यांचे दात न येण्यामागे हे आहे हैराण करणारे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.