ETV Bharat / sukhibhava

जोडीदाराशी बोलण्याच्या पद्धतीवरुनही होऊ शकतं भांडण, वाचा काय असतात नेमकी भांडणाची कारणं

Relationship Tips : कोणतेही नातं घट्ट होण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. संवादाशिवाय प्रत्येक नातं बिघडतं. पण कधी कधी गप्पा मारताना भांडण सुरू होतं, मग त्यामागं काही कारणं असू शकतात.

Relationship Tips
संवादाशिवाय प्रत्येक नातं बिघडतं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 5:35 PM IST

हैदराबाद : कोणतंही नातं घट्ट करण्यासाठी जोडीदाराशी संवाद आवश्यक असतो. नात्याच्या सुरुवातीच्या काळात सर्व काही ठीक होतं, पण जसजसं नातं जुनं होत जातं तसतसा संवाद कमी होतो आणि भांडणं वाढत जातात. कधी कधी चांगलं संभाषण होऊनही भांडण होतं. यासाठी अनेक कारणं असू शकतात, ज्यामुळं भांडणं होऊ शकतात आणि तुमचं नातं बिघडू शकतं. त्यामुळं तुमचं नातं वाचवण्यासाठी अशा चुका करणं टाळावं.

'या' कारणांमुळं होतात वाद :

  • प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणं : काहीवेळा आपण आपल्या जोडीदाराला अडवतो आणि स्वतःच बोलू लागतो, पण आपला जोडीदार काय बोलतो ते ऐकत नाही, त्यामुळं आपल्या जोडीदाराला असं वाटू शकतं की आपण त्याच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत आहात. त्यामुळे तुमच्या जोडीदारालाही बोलण्याची संधी द्या.
  • अंदाज लावणं : काहीवेळा लोक त्यांच्या जोडीदाराशी बोलत असताना अंदाज लावत राहतात. यामुळं तुमच्या जोडीदारासोबतचं नातं खराब होऊ शकतं.
  • तुमच्या जोडीदाराला दोष देणं : जेव्हा तुमचे तुमच्या जोडीदाराशी भांडण होत असेल तेव्हा तुमच्या जोडीदाराला कधीही दोष देऊ नका. असं केल्यानं तुमच्या पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो.
  • प्रत्येक गोष्टीत अतिशयोक्ती करणं : जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलताना प्रत्येक गोष्टीत अतिशयोक्ती करत असाल तर समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो आणि भांडण वाढू शकते.
  • नेहमी तक्रार करणं : जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना फक्त त्याच्याबद्दल तक्रार करत असाल तर यामुळे तुमच्या जोडीदाराशी भांडण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमचं नातं वाचवायचं असेल तर अशा चुका कधीही करू नका.
  • योग्य भाषेचा वापर करा : असभ्य किंवा आक्षेपार्ह भाषा वापरणं टाळावं. संवेदनशील विषयावर चर्चा करताना अनेकदा आपल्यात मतभेद होण्याची शक्यता असते. म्हणून, हे मतभेद टाळा आणि योग्य भाषा वापरून बोलत राहा.

हेही वाचा :

  1. चहा बनवताना आणि पिताना करू नका 'या' चुका; अन्यथा आरोग्याची होऊ शकते हानिकारक
  2. डोकेदुखीचेही आहेत 6 प्रकार; काय आहेत लक्षणं, वाचा सविस्तर
  3. गुलाबी पेरू आरोग्यासाठी फायदेशीर, हिवाळ्यात तो खाल्ल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.