ETV Bharat / sukhibhava

Rava Health Benefits : नाश्त्यात रव्याचे पदार्थ खाणं आहे फायदेशीर; जाणून घ्या काय आहेत फायदे... - incredible benefits

Rava Health Benefits : रव्याचे पदार्थ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. दैनंदिन आहारात याचा समावेश केला पाहिजे. हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. जाणून घ्या काय आहेत फायदे.

Rava Health Benefits
रव्याचे पदार्थ खाणं आहे फायदेशीर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 12:54 PM IST

हैदराबाद : Rava Health Benefits रवा हा आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे. विशेषतः यामुळं शरीराचं वजन नियंत्रणात राहतं. रव्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन-बी असतं. त्यात शरीराचं वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेले भरपूर पोषक घटक असतात. म्हणूनच आरोग्य तज्ञ सुचवतात की ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात रव्याचा समावेश करावा.

शरीरातील साखर नियंत्रित ठेवतं : मधुमेहाच्या रुग्णांसाठी रवा खूप फायदेशीर आहे. रव्याचे पदार्थ खाल्यानं तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. म्हणूनच स्नॅक्स करताना रवा घालून बनवलेलं अन्न खाल्ल्यास चांगले परिणाम मिळतील, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रवा खाल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. आता रवा दररोज आपल्या आहारात समाविष्ट करण्याचं आणखी फायदे जाणून घेऊ या.

भरपूर पोषक : रव्यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत. त्यात फोलेट आणि नियासिनसह लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-बी देखील असतं. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासोबतच हे पोषक घटक रक्त निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच शरीराचे सर्व अवयव.. त्यांचे कार्य योग्य पद्धतीने पार पाडण्यास मदत करतात.

वजन नियंत्रणासाठी उपयुक्त : वजन कमी करण्यासाठी रवा फायदेशीर आहे. रव्यामध्ये असलेले कर्बोदकं शरीराला सतत ऊर्जा देतात. ते घेतल्यास फार काळ भूक लागत नाही. रवा भूक नियंत्रित ठेवण्यासोबतच जास्त खाणं टाळण्यासही मदत करतं. त्यामुळं ज्यांना आपलं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल त्यांनी रव्याच्या पदार्थांचं सेवन जरूर करावं.

हाडांसाठी चांगलं : हाडे आणि सांध्यासाठी रव्याचे पदार्थ खाणं चांगलं असल्याचं म्हटलं जातं. रव्यामध्ये असलेले फॉस्फरस तोंडातील हाडं आणि दातांचं आरोग्य सुधारण्यास मदत करते. या रव्याच्या नियमित सेवनानं हाडांची घनता आणि एकूणच हाडांचे आरोग्य सुधारतं.

पचन सुधारतं : रव्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते. फायबरमुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते. त्यामुळे भूक लागत नाही. फायबर बद्धकोष्ठता देखील प्रतिबंधित करतं. हे चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस देखील उपयुक्तं असतं. त्यामुळं आतड्यांचं आरोग्य सुधारतं.

हेही वाचा :

  1. Fish Oil Benefits : फिश ऑइल आहे अनेक आजारांवर रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
  2. Mood Swings During Periods : पीरियड्समध्ये अशा प्रकारे होतो मूड स्विंग, जाणून घ्या यामागची कारणं
  3. Coffee for skin care : तुम्हालाही हवाय चेहऱ्यावर ग्लो? तर करा कॉफीचा असा वापर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.