ETV Bharat / sukhibhava

Women Mortality Rising Due To COVID : सावधान! गरोदर महिलांकरिता कोरोना ठरतोय जीवघेणा - ओमिक्रॉन

बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाच्या काळात अमेरिकेत गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा दावा केला आहे. बोस्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि मेरीलँड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

Women Mortality
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 18, 2023, 11:07 AM IST

बोस्टन : कोरोनामुळे अनेक नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारला रुग्णालयात पोस्ट कोविड विभाग सुरू करावे लागले आहेत. मात्र कोरोनामुळे महिलांचा गर्भधारनेच्या संबंधित आजाराने मृत्यू झाल्याचा दावा बोस्टनच्या संशोधकांनी केला आहे. या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार २०२१ मध्ये झालेल्या मृत्यू हे त्याच्या मागील वर्षाच्या मृत्यूपेक्षा जास्त असल्याचा स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांना चांगलाच हादरा बसला आहे.

माता मृत्यू दरांमध्ये चिंताजनक वाढ : अमेरिकेतील अनेक महिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेल्या गर्भधारनेच्या संबंधित आजाराने झाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या संशोधकांनी २०२० मध्ये कोरोना संसर्गाच्या पहिल्या वर्षात झालेल्या गरोदर महिलांच्या मृत्यूची आकडेवारी घेतली. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या गरोदर महिलांच्या मृत्यूची आकडेवारी घेऊन त्याबाबतचे संशोधन केले. यात गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. हे संशोधन बोस्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि मेरीलँड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी केले. हे संशोधन ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अल्पसंख्यांकामध्ये वाढले सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण : अमेरिकेत कोरोना झपाट्याने पसरला होता. त्यामुळे कोरोना रुग्णांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. त्यातच अमेरिकेत कोरोनामुळे गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या गरोदर महिलाच्या मृत्यूमध्ये अल्पसंख्यांक वर्गातील महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर हेल्थच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ३८ टक्के इतका माता मृत्यूचा दर वाढला आहे.

डेल्टा व्हेरियंटसह ओमिक्रॉनने घेतले बळी : अमेरिकेत आलेल्या कोरोनाने अनेक नागरिकांचा बळी घेतला. मात्र यात सर्वाधित नुकसान गरोदर महिलांचे झाल्याचा दावा या संशोधनातून करम्यात आला आहे. यात २०२१ मध्ये गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण एक लाख जन्मामागे तब्बल ४५.५ मृत्यू इतके होते. हा दर वाढून तिसऱ्या तिमाहीत तो ५६. ९ इतका झाला. अमेरिकेत कोरोनाच्या विविध व्हेरियंटने धुमाकूळ घातला होता. यात डेल्टा व्हेरियंटने जून २०२१ मध्ये संसर्ग पसरला. त्यानंतर आलेल्या ओमिक्रॉनने तर त्याहूनही अधिक संसर्गजन्य पसरवला. त्यामुळे अनेकांचा बळी गेल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.

हेही वाचा - Role Of Counselling In Cancer Patient : कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णाला समुपदेशनासह भावनिक, मानसिक आधाराची असते गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.