हैदराबाद : पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आजची मुलं अगदी वेगळ्या पद्धतीनं मोठी करावी लागतात. बहुतेक लोक आपल्या बाळाचे लाड करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. मुलांची लहानपणापासूनची प्रत्येक इच्छा पूर्ण केल्यानंतर आई-वडिलांसाठी पुढचा काळ संकटांनी भरलेला असतो. जेव्हा गोष्टी त्यांच्या इच्छेनुसार होत नाहीत, तेव्हा मुलांचं वर्तन आक्रमक होऊ लागतं. त्यानंतर पालकांना राग दाखवण्याशिवाय पर्याय राहत नाही. मुलांचं आक्रमक वर्तन व्यवस्थापित करण्यासाठी, आपल्याला काही पद्धतींचा अवलंब करणं आवश्यक आहे, कारण काहीवेळा नकळत आपण स्वतः मुलांच्या वर्तनास जबाबदार असतो. तुमच्या मुलाचा राग खूप तीव्र असेल तर तुम्ही या टिप्सची मदत घेऊ शकता.
आक्रमक वर्तन व्यवस्थापित करण्यासाठी टिप्स :
- अनेक वेळा मुल विनाकारण रागानं तुम्हाला मारायला लागतं. तेव्हा मुलाला मारण्याऐवजी, त्याच्या डोळ्यात बघून त्याला तुमच्या भावना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याचं वागणं खूप चुकीचं आहे याची मुलाला जाणीव करून देणंही खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्या कृतींना प्रोत्साहन देऊ नका.
- काहीवेळा असे होऊ शकतं की मुलं तुम्हाला त्यांच्या मनाची गोष्ट मान्य करू इच्छितात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचं ऐकणं आणि त्यांच्या रागाचं कारण समजून घेणं फार महत्वाचं आहे. मुलाकडं लक्ष दिलं नाही तरी त्याचं वागणं आक्रमक होऊ लागतं. तसं असल्यास, मुलाच्या भावना समजून घ्या.
- आक्रमक मुले रागाच्या भरात कोणत्याही गोष्टीला चुकीची उत्तरं देऊ लागतात. त्यांना प्रतिसाद देण्यासाठी सौम्य पद्धतीनं शिकवणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे शक्य आहे की तुमचं मूल बाहेरच्या लोकांसमोरही गैरवर्तन करू शकतं. अशा वेळी सर्वांसमोर त्याला मारण्यापेक्षा किंवा मारहाण करण्यापेक्षा त्याला प्रेमानं समजावून सांगा.
- मुलांच्या सीमा निश्चित करणं फार महत्वाचं आहे. त्यांना ऐकण्याची सवय लावावी. त्यांना कितीही राग आला तरी चालेल. काहीही झालं तरी माझ्या शब्दाची अवज्ञा होणार नाही, असा आदर त्यांच्या मनात असला पाहिजे. या स्थितीत दोन्ही पालक समान असले पाहिजेत.
हेही वाचा :
- Magnesium Deficiency : शरीरात मॅग्नेशियमची कमतरता ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या काय असतात लक्षणं...
- Egg Benefits For Hair : केसांना अंडी लावण्याचे आहेत अनेक फायदे; कोंडा दूर होण्यास होते मदत
- Karela Benefits : रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यापासून ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यापर्यंत, जाणून घ्या कारल्याचे अगणित फायदे