मजबूत, मऊ आणि चमकदार केसांसाठी डोक्यावर तेल मालिश करणे आवश्यक मानले जाते. मात्र, बदलत्या काळात नवीन पिढी तेल लावण्याऐवजी कंडीशनर आणि सीरमच्या वापराला प्राधान्य देतात, जे वरवर केसांवर परिणाम करतात. मात्र, डोक्यावर तेल मालिश केल्याने संपूर्ण शरीराला फायदा होतो, पण यासाठी योग्य प्रकारे मालिश होणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला तेल मालिशचे फायदे आणि डोक्यावर तेल मालिश करण्याचा योग्य मार्ग सांगणार आहोत.
तेल मालिशचे फायदे
डोक्यावर तेलाची मालिश केवळ केसांसाठीच नव्हे तर, त्वचेसाठी देखील फायद्याची असते. डोक्यावर तेल मालिशचे फायदे पुढील प्रमाणे आहेत,
- डोक्यावर तेल मालिश केल्याने केसांना फायदा होतोच, त्याचबरोबर शरीरात रक्ताभिसरण देखील चांगल्या प्रकारे होते. चांगली तेल मालिश काही मिनिटांत तुम्हाला ताजेतवाणे करते, डोकेदुखीपासून आराम देते आणि तणावमुक्त करण्यात मदत करते. मालिश केल्याने स्कॅल्पची बंद छिद्रे देखील उघडतात.
- केसांना तेल लावल्यास ते बळकट होतात, त्याचबरोबर केसांची सामान्य समस्या जसे, त्यांचे तुटणे, गळणे, दोन तोंडी केस आणि केस पातळ होणे इत्यादी दूर होते.
- तेलाची नियमित मालिश डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा दूर करते आणि नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते. तेल मालिश केल्याने केसांना कोंडा होण्याची समस्या दूर होते आणि केसांचे अकाली पांढरे होणे थांबते.
- रोज झोपण्यापूर्वी डोक्याची तेल मालिश केल्याने झोप चांगली येते.
तेल मालिश करण्याचा योग्य मार्ग
तेल मालिश करण्यासाठी सर्वात आधी आपल्या आवडत्या तेलाला हल्के गरम करणे महत्वाचे आहे. मालिश करण्यासाठी तेलाला बोटांच्या मदतीने संपूर्ण स्कॅल्प आणि केसांच्या मुळापासून टोकापर्यंत चांगल्याने लावा. त्यानंतर सर्कुलेशन मोडमध्ये सुमारे 10 ते 15 मिनिटे डोक्याची हल्क्या हाताने मालिश करा. डोक्याला लागलेले तेल कमीत कमी एक तासापर्यंत तसेच राहू द्या. एका तासानंतर एक टॉवेल गरम पाण्यात बुडवा, पाणी पिळून घ्या आणि त्यास डोक्यावर पगडीसारखे बाधून घ्या, ते 5 मिनिटे तसेच ठेवा. या प्रक्रियेला तीन ते चारवेळा करा. याने केस आणि डोक्याच्या त्वचेत तेल चांगल्या प्रकारे शोषून जाईल. त्यानंतर डोके सौम्य शाम्पूने धुवा.
काही लोक रात्री डोक्यावर तेल लावणे पसंत करतात, अशा स्थितीत डोक्याला तेल मालिश केल्यानंतर केस सैल बांधून झोपा आणि सकाळी शाम्पू करा. परंतु, हिवाळ्यात रात्री तेल लावणे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण, तेलाची तासीर ही थंड असते, त्यामुळे रात्री डोक्याला तेल लावून झोपल्याने सर्दी होऊ शकते.
केसांसाठी कोणते तेल चांगले?
आपल्या त्वचेप्रमाणे आपल्या केसांची प्रकृती देखील वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे, वेगवेगळ्या केसांसाठी वेगवेगळे तेल लावले पाहिजे. केसांच्या प्रकृतीनुसार लावले जाणारे तेल पुढील प्रमाणे आहे,
1) सामान्य केस - या प्रकारच्या केसांना सामान्यत: कोणत्याही प्रकारचे तेल लावता येते जसे, नारळ तेल, बदाम तेल आणि ऑलिव्ह (जैतून) तेल इत्यादी.
2) तेलकट केसांसाठी - स्कॅल्पमध्ये असलेल्या सेबेसियस ग्रंथिमधून अत्याधिक तेल निर्मिती होणे हे केसांचे तेलकट होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. अशात या प्रकारच्या केसांसाठी असे तेल फायदेशीर ठरेल जे तेलाच्या निर्मितीला कमी करेल. यासंबंधी एका संशोधनातून माहिती मिळते की, हर्बल ऑईल वसामय ग्रंथींचे सामान्य कार्य राखते. त्याचबरोबर, ते नैसर्गिकरित्या केसांच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासही मदत करू शकते.
3) कोरड्या केसांसाठी - या प्रकारच्या केसांमध्ये ओलावा कमी असतो, ज्यामुळे ते कोरडे वाटू लागतात. अशा केसांना ओलावा प्रदान करेल, अशा तेलाची गरज असते जसे, एरंडेल तेल आणि नारळ तेल. या दोन्ही तेलांमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत.
हेही वाचा - सावधान..! 'या' रोगामुळे सेक्स लाईफवर पडू शकतो प्रभाव, वाचा..