ETV Bharat / sukhibhava

वंध्यत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज - वंध्यत्व सामाजिक समस्या

एकदा लग्न झाले की, मुले होणे हे गृहितच धरले जाते. त्यामुळेच ज्यांना मूल होत नाही, त्यांच्यासाठी हे अतिशय वेदनादायक ठरते. एखाद्या जोडप्याला विशेषत: स्त्रीला मुल होत नसेल तर समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. यामुळे तणावात वाढ होते. अशा जोडप्याला फक्त वैद्यकीय समस्येलाच नाही, तर सामाजिक समस्येलाही तोंड द्यावे लागते. याबद्दलच ईटीव्ही भारत सुखीभवच्या टीमने प्रसूती रोग विशेषज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. पूर्णा सहकारी यांच्याशी बातचीत केली.

Infertility
वंध्यत्व
author img

By

Published : Nov 9, 2020, 1:10 PM IST

हैदराबाद - पालकत्वाच्या प्रवासाचा अनुभव घ्यायला जवळपास सर्वच उत्सुक असतात. काहींवर ही कृपा लगेच होते, तर काहींना मात्र जड अंत:करणाने आई आणि बाबा होण्याची वाट पहावी लागते. आपण वंध्यत्वाच्या समस्येची संख्या पाहतो, तेव्हा ते फक्त हिमनगाचे शिखर असते. कारण याच्याशी सामाजिक दृष्टिकोनही जोडला जातो. समाज म्हणून देखील वंध्यत्वाकडे आपण एक वैद्यकीय समस्या म्हणूनच पाहिले पाहिजे.

वंध्यत्व म्हणजे काय ?

एक वर्ष निरोधाचे कुठलेही साधन न वापरता संभोग करूनही स्त्री गर्भवती होत नसेल, तर ते वंध्यत्व असते.

वंध्यत्वाची कारणे?

वंध्यत्वाची अनेक कारणे आहेत. पत्नी आणि पती दोघांमध्येही हा दोष असू शकतो. स्त्री आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. मात्र, काहींमध्ये ठोस कारणे सापडत नाहीत. अशा समस्यांना ‘अनएक्सप्लेन्ड’ म्हटले जाते.

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे -

  • गर्भाशयातील अंड्यांची अयोग्य पद्धतीने वाढ
  • एनोव्युलेशन (अंडाशयातून अंडी उत्पन्न न होणे)
  • पोलिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोम
  • गर्भ नलिकेत दोष असणे
  • गर्भाशयामध्ये दोष असणे
  • शुक्राणूंच्या प्रवेशास अडथळा असणे
  • एंडोमेट्रिओसिस (गर्भाशयाच्या बाहेर पेशींची वाढ)
  • स्त्रीचे वाढते वय

पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे -

  • शुक्राणूंचा अभाव
  • शुक्राणूंच्या गतिशीलतेची समस्या
  • शुक्राणूंमध्ये दोष
  • स्खलनाची समस्या

दोघांमधील समान समस्या -

मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब, काही स्वयंप्रतिकार रोग, लैंगिक संक्रमित रोग या सारख्या वैद्यकीय समस्यांचा परिणाम प्रजननावर होतो. धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, काही औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने पुरुषांमधील वीर्यावर परिणाम होतो आणि स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन उद्भवू शकते. योग्य लैंगिक शिक्षणाचा अभाव, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या चक्रादरम्यान लैंगिक संबंधाची अयोग्य वेळ, इत्यादींचा गर्भधारणेवर परिणाम होतो.

वंध्यत्वाचा काय परिणाम होतो?

वंध्यत्वाचा जोडप्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. जोडपे तणावात आणि औदासिन्यामध्ये जाऊ शकते. वंध्यत्वामुळे अनेकदा अशी जोडपी एकटी पडतात. बराच काळ घेतलेल्या उपचारामुळे जोडप्यांवर आर्थिक ओझेही येते.

अधिक माहितीसाठी डॉ. पूर्णा सहकारी purvapals@yahoo.co.in यांच्याशी संपर्क साधावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.