हैदराबाद : Navratri 2023 नवरात्रीचा उत्सव देशभरात अनेक प्रकारे साजरा केला जातो. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भव्य दुर्गापूजेचं आयोजन केलं जाते. गुजरातमध्येही नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया खेळण्याची प्रथा आहे. त्यामुळं नवरात्रीत लोक अनेकदा गरबा आणि दांडिया खेळतात. पण गरबा आणि दांडिया यातील फरक फार कमी लोकांना माहीत आहे. होय, गरबा आणि दांडियाची नावं ऐकून अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे बहुतेक लोक या दोन नृत्य सादरीकरणांना एक समजतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गरबा आणि दांडिया एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. जाणून घ्या गरबा आणि दांडियामध्ये काय फरक आहे.
गरबा आणि दांडियाचं महत्त्व : नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्याला खूप महत्त्व आहे. विशेषतः गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याची प्रथा शतकानुशतके जुनी आहे. नवरात्रीच्या सणात दुर्गा मातेच्या किंवा अखंड ज्योतीच्या मूर्तीसमोर गरबा आणि दांडिया खेळला जातो.
गरबा आणि दांडियाचा अर्थ : गरबा आणि दांडिया या दोन्हींचे अर्थ एकमेकांपेक्षा बरेच वेगळे आहेत. गरबा हा शब्द गर्भातील बाळाच्या जीवनापासून बनला आहे. गरबा दरम्यान लोक जीवनाच्या चक्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मंडळांमध्ये नृत्य करतात. तर दांडिया नृत्य हे माता दुर्गा आणि महिषासुर यांच्यातील युद्धाचं प्रतीक आहे. त्यामुळं दांडियामध्ये लोक तलवारींऐवजी रंगीबेरंगी काठ्या घेऊन नाचतात.
गरबा करण्याचे नियम : सुरुवातीच्या काळात फक्त महिलाच गरबा नृत्य सादर करत असत. पण आजच्या काळात स्त्री-पुरुष दोघे मिळून गरबा खेळतात. आता गरबा फक्त गुजरातच्या हद्दीपुरता मर्यादित नाही. तर नवरात्रीला देशात अनेक ठिकाणी गरबा नृत्याचे आयोजन केले जाते.
दांडिया खेळण्याचे कारण : धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत दांडिया खेळणं खूप शुभ आहे. त्यामुळं नऊ दिवस दररोज सायंकाळी देवीची पूजा केल्यानंतर तेथे उपस्थित भाविक दुर्गा मातेच्या मूर्तीसमोर दांडिया करतात. विशेषत: नवरात्रीच्या दिवसांत गुजरातच्या प्रत्येक गल्लीबोळात दांडियाचा आवाज ऐकू येतो.
हेही वाचा :
- Shardiya Navratri 2023 : शारदीय नवरात्रीत उपवास करताय ? घ्या अशी आहाराची काळजी, बनवा हे पदार्थ...
- Shardiya Navratri 2023 : लवकरच सुरू होतोय नवरात्री उत्सव; जाणून घ्या देवी दुर्गा कोणत्या वाहनावरून करणार आगमन...
- Gupt Navratri 2023 : 19 जूनपासून सुरू होत आहे गुप्त नवरात्र; जाणून घ्या घटस्थापनेची वेळ आणि पूजेची पद्धत