हैदराबाद : भारताची सागरी सीमा भक्कम असून देशाला विस्तृत असा समुद्री तट लाभला आहे. त्यामुळे भारतीय सागरी सीमेची सुरक्षा आणि ही जबाबदारी पार पाडणाऱ्या जवानांना या दिवशी प्रोत्साहित करण्यात येते. 5 एप्रिल हा देशात सागरी सुरक्षा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यामुळे जाणून घेऊया या दिनाच्या इतिहास आणि त्याच्या महत्वाची माहिती.
काय आहे राष्ट्रीय सागरी दिनाचा इतिहास : देशातील पहिल्या वाफेवर चालणाऱ्या एस. एस. लॉयल्टी या जहाजाने 5 एप्रिल 1919 ला मुंबईवरुन ब्रिटनकडे प्रयाण केले. त्यामुळे भारतीयांनी वेगळा इतिहास निर्माण केला. एस. एस. लॉयल्टी हे जहाज बनवणारी कंपनी ही पूर्णपणे भारतीय होती. सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेड असे त्या एस. एस. लॉयल्टी हे जहाज बनवणाऱ्या कंपनीचे नाव होते. त्यामुळे 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो. पहिला सागरी दिन 1964 ला साजरा करण्यात आला असून तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्राला लाभला 721 किमीचा किनारा : देशात दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येत असून आपली सागरी सीमा भक्कम असल्याचे या दिवशी स्पष्ट होते. महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्याला तब्बल 721 किमीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे राज्याच्या सौदर्यात भरच पडली आहे. तर भारताला तब्बल 7517 किमीचा सागरी किनारा लाभला आहे. राज्यातील मुंबई हे महत्वाचे शहर असून मुंबई शेजारी नाव्हाशेव्हा हे महत्वाचे बंदर आहे. त्यासह राज्यात अनेक लहान लहान बंदरामुळे व्यापार व्यवसायाला चालना मिळत आहे.
देशात आहेत 12 प्रमुख बंदरे : देशाला लाभलेल्या महत्वाच्या बंदरांमुळे भारताच्या व्यापारात चांगलीच भर पडली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील साधने सागरी मार्गाने देशात सुलभतेने येऊ शकतात. देशात सध्या प्रमुख 12 बंदरे आहेत. त्यासह देशात 185 लहान बंदरे असल्याचेही दिसून येते. त्यामुळे व्यापाराला चालना मिळते.
हेही वाचा - Skin And Hair Affected By Heat : उन्हाळ्यात वाढतात त्वचा आणि केसांचे विकार; अशी घ्या काळजी