पूर्वीच्या काळात असे म्हटले जात होते की, जेव्हाही तुम्ही अस्वस्थ व्हाल तेव्हा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा, तुम्हाला बरे वाटेल. या विचारामुळे अनेक लोक आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलबून राहायचे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतांश लोक आपल्या जीवनात इतके व्यस्त असतात की, इतरांचे काय तर ते स्वत:बाबत देखील विचार करू शकत नाही. ज्याचा परिणाम त्यांचे मानसिक आरोग्य, व्यवहार आणि शारीरिक आरोग्यावरही होतो. या प्रकारच्या स्मस्यांपासून बचाव करण्यासाठी मानसिक आरोग्य सल्लागार आजकाल मानसिक आरोग्याची सुधारणा, उत्तम उर्जा आणि तणावमुक्त होण्यासाठी 'मी टाईम' म्हणजेच, स्वत:बरोबर एकटा वेळ घालवण्यावर भर देतात.
एकटे वेळ घालवणे का आवश्यक आहे?
प्रसिद्ध लेखक डेनियल कन्नमन यांचे पुस्तक 'थिंकिंग फास्ट अँड स्लो' मध्ये सागण्यात आले आहे की, जे लोक एकटे वेळ घावलतात ते शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक तणावापासून बऱ्याच प्रमाणात दूर राहतात. खरे तर, सतत लोक भोवती असल्यामुळे एकाग्रता आणि निर्णय घेण्यावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे अनेक वेळा रागही येतो. तसेच, लेखक जोसेफ मर्फी यांचे पुस्तक 'पॉवर ऑफ द सबकॉन्शियस माइंड'नुसार, आपले शरीर आपल्या मेंदूच्या सूचनेनुसार चालते, त्यामुळे त्याच्यात येणारे सकारात्मक, आनंददायी विचार आणि भावना आपले मन आणि शरीर दोघांनाही सुंदर आणि निरोगी बनवतात. दुसरीकडे, मेंदूत येणारे नकारात्मक विचार शरीरात रोग निर्माण होण्याचे कारण ठरतात.
वेलनेस तज्ज्ञ काय म्हणतात?
मेंटल वेलनेस तज्ज्ञ आणि जैविक वेलनेस की फाउंडर व सी.ई.ओ नंदिता सांगतात की, संपूर्ण दिवसातील काही वेळ जर तुम्ही स्वत:सोबत घालवला तर, तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचे अधिक चांगल्या प्रकारे मुल्यांकन करू शकता. नंदिता सांगतात की, तुम्ही तुमचे आवडते कार्य, जसे गाणे ऐकणे किंवा कोणती हॉबी पूर्ण करण्यात वेळ घालवणे यामुळे न केवळ तुम्हाला चांगले वाटेल तर, तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त झाल्याचा अनुभव येईल.
नंदिता सांगतात की, पुरुष असो किंवा काम करणारी/गृहिणी घर आणि बाहेरच्या जबाबदाऱ्यांमुळे स्वत:ला विसरून जातात आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा त्यास इतर काम पूर्ण करण्यासाठी खर्च करतात. विशेष म्हणजे, महिलांविषयी बोलायचे झाले तर, बहुतांश महिला वयाच्या 35 व्या वर्षानंतर काही वेळ एकटे घालवण्याची इच्छा बाळगू लागतात. असा वेळ जो त्यांचा असेल ज्यात पती आणि मुलांची काळजी किंवा ऑफीसचे कार्य पूर्ण करण्याचा तणाव असणार नाही. त्या पुढे सांगतात की, त्यांच्याकडे काउन्सिलिंगसाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या महिला आपले आयुष्य, रोजचे काम आणि भांडणांबद्दल इतक्या चिंतेत असतात की, त्या तणावाच्या आहारी जातात. परिणामी, त्यांच्यात चिडचिड आणि राग खूप वाढतो.
नंदिता सांगतात की, त्यांच्याकडे येणाऱ्या महिला आणि पुरुष दोघांनाही त्या स्वत:शी मैत्री करणे आणि स्वत:ला समोर ठेवण्याचा सल्ला देतात. कारण, जर ते स्वत: आनंदी नाही राहू शकले तर, ते दुसऱ्यांना आनंदी ठेवू शकणार नाही. नंदिता त्यांना त्यांच्या खासगी वेळेत आपल्या आवडीचे कार्य करणे, आवडीचे जेवण करणे आणि शक्य त्या मार्गाने स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देतात.
तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबरोबर वेळ घालवू नये किंवा त्यांच्याशी बोलू नये, असा मी टाईमचा अर्थ होत नाही, तर दिवसातील काही क्षण स्वत:बरोबर घालवणे आणि आपल्या आवडीचे काम करणे, असा त्याचा अर्थ होतो. असे काही तरी करा ज्यामुळे तुम्हाला दिवसभर आनंदी आणि तणावमुक्त वाटेल, असेही नंदिता यांनी सांगितले.
हेही वाचा - डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स आहेत? 'या' टीप्स ठरू शकतात फायदेशीर