हैदराबाद : हिंदू धर्मात महत्वाचे उत्सव आणि सण साजरे करण्यात येतात. त्यातील अनेक उत्सव आणि व्रत वैशाख महिन्यात येत असल्याने वैशाख महिना महत्वाचा असल्याचे मानले जाते. आगामी मे महिना हा अत्यंत चांगल्या तिथीपासून सुरू होत असल्याने मे महिन्यातही महत्वाचे सण आणि उत्सवांचा राहणार आहे. हिंदू पंचागांनुसार मे महिन्याची सुरूवात मोहिनी एकादशीपासून सुरू होत आहे.
कोणते आहेत महत्वाचे सण आणि उत्सव : मे महिन्याची सुरुवात मोहिनी एकादशीने होते आहे. मोहिनी एकादशी 1 मे रोजी असून मे महिन्याच्या सुरुवातीला वैशाख महिना राहणार आहे. त्यानंतर मात्र ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मे महिन्यात महत्वाचे सण आणि उत्सवांची मोठी मांदियाळी लागणार आहे. यात वैशाख शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह जयंती येत आहे. भगवान विष्णूनी याच दिवशी नरसिंहाचे रुप घेऊन हिरण्यकक्षपूचा वध करुन धर्माची स्थापना केली होती. तर अखिल जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बगवान गौतम बुद्धाची जयंतीही मे महिन्यात साजरी करण्यात येत आहे. 5 मे रोजी बुद्ध जयंती आणि चंद्रग्रहण असा अनोखा योग जुळून येत आहे.
मे महिन्यात वर्षातील पहिले चंद्रग्रहण : या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मे महिन्यात दिसणार आहे. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मे महिन्यात लागणार असून बुद्ध पौर्णिमेच्याच दिवशी हा योग जुळून आला आहे. त्यासह वट सावित्री पौर्णिमा, शनि जयंती, निर्जला एकादशी असे महत्वाचे सण आणि उत्सव मे महिन्यात आहेत.
मे महिन्यातील महत्वाचे सण आणि उत्सव :
1 मे - सोमवार - मोहिनी एकादशी
2 मे - मंगळवार - परशुराम द्वादशी
3 मे बुधवार - प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष)
4 मे गुरुवार - नरसिंह जयंती
5 मे शुक्रवार - बुद्ध पूर्णिमा, चंद्र ग्रहण
6 मे शनिवार - ज्येष्ठ महिना सुरू
8 मे सोमवार - संकष्टी चतुर्थी
12 मे शुक्रवार - कालाष्टमी
15 मे सोमवार - अपरा एकादशी
17 मे बुधवार - प्रदोष व्रत (कृष्ण)
19 मे शुक्रवार - शनि जयंती, वट सावित्री व्रत
23 मे मंगळवार - विनायक चतुर्थी
25 मे गुरुवार - स्कंद षष्ठी व्रत
29 मे सोमवार - महेश नवमी
30 मे मंगळवार - गंगा दशहरा
31 मे बुधवार - निर्जला एकादशी, गायत्री जयंती,
हेही वाचा - Chaitra Purnima 2023 : काय आहे चैत्र पौर्णिमेचे महत्व, कशी करतात पूजा; जाणून घ्या सविस्तर माहिती